Bollywood

रातां लंबिया लंबिया म्हणत..कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा अडकणार लग्न बेडीत..!

रातां लंबिया लंबिया म्हणत..कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा अडकणार लग्न बेडीत..!

बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू मिळत आहे. एकापाठोपाठ एक अभिनेते अभिनेत्री विवाह बंधनात अडकत आहेत. मागच्याच महिन्यात प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाह संपन्न झाला.
विकी कॅटरीनाच्या लग्नाच्या बा’तम्या संपतात, तोपर्यंतच अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या लग्नाचे फोटो समोर आले. आपला लॉन्ग टाइम बॉय-फ्रेंड विकी जैनसोबत काही दिवसांपूर्वी अंकिताने लग्न केले. आता अजून एका सेलिब्रिटी कपलच्या लग्नाच्या बातम्या उधाण आले आहे. कियारा अ’डवा’णी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल पैकी एक आहे.

शेरशहा सिनेमांमध्ये त्यांची केमिस्ट्री त्यांच्यासाठी अत्यंत खास ठरली. या सिनेमांमधील त्यांची केमिस्ट्री बघून हे दोघे नक्कीच एकमेकांच्या प्रे’मात आहेत, अशी खात्री त्यांच्या चाहत्यांना पटली. अधिकृतरित्या जाहीरपणे, या दोघांनी आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं नसलं तरीही बऱ्याच काळापासून बॉलिवुडमध्ये त्यांच्या लींक-अपच्या चर्चा रंगल्या आहेत.
येणाऱ्या वर्षी हे दोन्ही लोकप्रिय स्टार्स लग्न बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं नातं सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात चांगलेच वेडे झाले आहेत. हे दोघे आता लवकरच लग्न करणार आहेत अशी चर्चा आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील पुढच्या वर्षी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शेरशाह सिनेमांमध्ये कियारा आणि सिद्धार्थ हे दोघे प्रथमच एकत्र झळकले. मात्र असे असले तरीही मागील जवळपास दोन वर्षांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली असताना दोघांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे संकेत दिले होते. अद्याप या दोघांनी आपल्या नात्याचा खुलासा नसला केला तरीही लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button