Aurangabad

कापूसवाडगांव ते वांजरगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुर्ण

कापूसवाडगांव ते वांजरगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुर्ण
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कापुसवाडगाव येथील योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज व त्यांच्या मातोश्री अन्नपुर्णा माता यांच्या पदस्पर्शाने तयार झालेला. जुना कापुसवाडगांव ते वाजंरगाव या दोन गावांना जोडणारा अंत्यत जवळचा हा मुख्य रस्ता. अनेक वर्षांपासून परिसरातील शेतकरी तसेच श्रीक्षेत्र सराला बेटाकडे जाणारा भाविकांचा मार्ग, मागील काळापासून बंद होता. या रस्त्याचा वापर फक्त श्रावण महिन्यात मोठ्या महादेवाला पाणी घेऊन येण्यासाठी तसेच पाणी घेऊन जाण्यासाठी भाविकांना पायी चालण्यासाठी होत असे. परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतातील पिकांची काढणी पश्चात वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असे.
पावसाळ्यात हा रस्ता पायी चालण्यासाठी बंदच राहत असे. परिसरातील शेतकर्‍यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे (सर) यांची भेट घेतली, व तत्काळ आमदार बोरनारे सर व बाबासाहेब जगताप यांनी स्वताः या रस्त्याची पाहणी करून गावचे माजी सरपंच व सध्याचे सरपंच तसेच उपसरपंच यांच्या मदतीने या रस्त्यावरील अडचणी व वाद मिटवुन या रस्त्याच्या दुरूस्तीला आमदार निधीतून व स्वखर्चातुन आ. बोरनारे सर यांनी सुरुवात केली.
अखेर रविवारी या रस्त्याची दुरूस्ती पूर्णत्वास आली, यावेळी आमदार रमेश बोरनारे सर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप यांनी दुरूस्त झालेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकर्‍यांनी वडीलोपार्जीत बंद असलेला रस्ता पुन्हा सुरू केल्याबद्दल आमदार बोरनारे सर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सरपंच आशाबाई रामनाथ धामने, उपसरपंच नानासाहेब थोरात, माजी सरपंच अशोक थोरात, माजी पोलिस पाटील बाळासाहेब निगळ, प्रदिप साळुंके, विलास निगळ, शिवनाथ निगळ, प्रकाश थोरात, लक्ष्मण निगळ, मारूती निगळ, सुधीर फुकटे, सुनिल थोरात , प्रल्हाद गिरी, योगेश घोगते, लक्ष्मण त्रिभुवन व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button