Maharashtra

?? अदृश्य युद्ध कोरोना

अदृश्य युद्ध कोरोना

ले अनिता जावळे-वाघमारे

निसर्गामध्ये जेव्हा मानवी हस्तक्षेप होऊ लागला आणि निसर्गाने आपले रौद्र रूप धारण केलेले नेहमीच दाखवले आहे.सुनामी, भूकंप,अतिवृष्टी दुष्काळ ,महामारी हे माहितच आहेच.माणसाने निसर्गात हस्तक्षेप केला नाही तर आपले जीवन तो सुखी करणार हे निश्चित आहे .परंतु माणसाच्या हव्यास वृत्तीमुळे स्वतःचे नुकसान माणूस करून घेत आहे.निसर्गाकडून आपल्याला हवा, पाणी ,जमीन सर्व काही फुकट मिळाले आहे .परंतु मानवाच्या हव्यासी वृत्तीमुळे निसर्गातील स्वतःचे अस्तित्व नष्ट करण्याच्या प्रयत्न तो करत आहे .अनेक वेगवेगळे साथीचे रोग येऊ पाहत आहेत. आताच्या घडीला म्हणजे साल 2020 महाभयानक कोरोना विषाणू देखील माणसासाठी घातक ठरत आहे.डिसेंबर सन19 मधे चिन मध्ये हुआन शहरात प्रथम हा विषाणू आढळून आला.तीन हजारापेक्षा माणसं मेली गेली आहेत. याचा प्रसार जगभर पसरत आहे. हात लावेल तिथे कोरोना अस काही दृश्य आहे.जगामध्ये बलाढ्य अशा देशांनी देखील हात टेकवलेले दिसत आहेत. अमेरिका ,फ्रान्स, इटली, इरान युरोपीय राष्ट्रांमध्ये हाहाकार उठलेला दिसत आहे.हजारो माणसं मरत आहे .मेडिकल सुविधा जगात उच्च दर्जा असलेले हे राष्ट्र हतबल झालेले दिसत आहे . त्यामध्ये आशियाई राष्ट्राचा देखील समावेश होत आहे.हजारो माणसं मरत आहेत .जगातील बहुतांशी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे.आता माणसं पिंजऱ्यात बसलेल्या पक्षासारखी स्वतःच्या घरात कैद झाली आहेत. याचं कारण मानवाने केलेला निसर्गामध्ये हस्तक्षेप.चिन सारख्या व इतर देशांमध्येअन्नसाखळी तोडण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.या मुळे पृथ्वीवरील जीव जंतू समतोल बिघडत आहे.काही पशू पक्षी जाती नष्ट होत होत आहेत .यातून स्वाईन फ्लु असेल किंवा सार्स सारखे महाभयानक रोग निर्माण होत आहेत .याचा परिमाण देखील मानवाला भोगावा लागत आहे .आज जगा समोर कोरोना सारखा अदृश्य शत्रूने अनेक देशावर आपला ताबा मिळवला आहे.या कोरोना विषाणू वर ताबा मिळवण्यासाठी अनखी मानवासऔषध निर्माण करण्यात यश मिळाले नाही .कोरोना झपाट्याने वाटत आहे गुणाकाराच्या पटीत हा आपला खेळ खेळत आहे.
भारता सारख्या देशात देखील या कोरोनाने आपले पाय रोवायला सुरुवाद केली आहे.देश लॉक डाऊन झाला आहे.माणसं आपल्याच घरात कैद झालीत.अर्थवेसस्था पूर्ण कोलमडली आहे.शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालय सर्व काही बंद.रस्ते आता शांत झालेत.सर्वत्र शांतता पसरली आहे .पूर्ण सकाळीच पक्षांचा आवाज थोडा फार कानी यायचा आता दिवसा देखील पक्षांची किलबीलाट ऐकू येत आहे.आता पक्षी काय ते आपले स्वातंत्र्य उपभोगत असतील .मानसाला मात्र स्वातंत्र्य काय असते याची जाणीव होत असेल .कोरोना अदृश्य शत्रू आपली वाटचाल केव्हा थांबवणार माहित नाही.रस्ते कधी बोलतील माहित नाही खरेतर हे आधुनिक काळातील हे जैविक युद्ध आहे यात शंकाच नाही.मानवाने विज्ञान तंत्रज्ञान यावर आपली प्रगती साधली पण याचा तो घातक प्रयोग देखील करत आहे पहिले व दुसरे महायुद् आम्ही पाहिले नाही पण ज्या काळात युद्ध झाले तो इतिहास वाचला तर अंगावर शहारा येतो .अनेक सैनिक माणसं या युद्धात जायबंदी आणि मरण पावले.अनेक घातक क्षेपणास्त्र ,अण्वस्त्र,लढाऊ विमान ,जहाज आणि काय काय बलाढ्य देशानी बनवले आहेत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा उपयोग या कोरोनावर झाला नाही. आता सीमारक्षक सैनिकाची गरजच नाही .शत्रूने कधी आपल्यादेशात प्रवेश केला हे समजले पण नाही .शासन ,शास्त्रज्ञ अभ्यासक हतबल झाले आहेत .हात लावाल तिथ मी ! असा संदेशच जणू हा विषाणू देत आहे .देवाने देखील स्वतःला देवळात कोंडून घेतल आहे.ज्या देवाकडे माणसं आशा ठेवत की संकटात मला देवच तारेल म्हणून. उपास तापास नवस काय नाही ते करत आहेत पण काही उपयोग झाला नाही. माणस आता दगडच्या देवाला देखिल मास्क लावत आहे भीती वाटत आहे देवाला कोरोना होईल याची म्हणून !आता फक्त हॉस्पिटल आणि डॉक्टर हेच माणसाला तारत आहेत.डॉक्टर पोलीस सैनिक परिचारक आपला जीव धोक्यात घालून लढाई करत आहेत.हे खरे तर तिसरे महायुद् म्हणायला काही हरकत नाही .युद्धा मुळे नाश होतो हे निश्चित म्हणून आता तरी सावध होयला हव या मानव जातीने .जगा आणि जगू द्या तत्त्व अंगिकारायला हव .नाहीतर समस्थ मानव जात नष्ट होयला वेळ लागणार नाही .जगातील कुठल्याही देशातला माणूस तो माणूसच येथे भेद नाही म्हणून
सुरक्षित रहा आणि विचार करा जरा.
जगा आणि जगू द्या !

अनिता जावळे-वाघमारे
मु.पो .मुरुड ता.जि.लातूर
9545050292

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button