? ठोस प्रहार ब्रेकिंग..मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढल्या..! ग्राहकांच्या खिश्याला फोडणी.. मोजावे लागतील दुप्पट पैसे …
भारतात सर्वात जास्त मोबाईल ग्राहक आहेत. आणि मोबाईल ग्राहकांना रिचार्जसाठी दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. एअरटेलचे फाउंडर व चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी आगामी टॅरिफ महाग केला जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना आता मोबाईल रिचार्ज साठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. आता महिन्याला ४५ रुपये च्या प्लॅनला हा १०० रुपये मोजावे लागतील.
१०० रुपयांत मिळणार १ जीबी डेटा
ग्राहकांना १६० रुपयात १.६ जीबी डेटा मिळू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त किंमतलागू शकते.मित्तल पुढे म्हणाले की आम्हाला यूएस किंवा यूरोपसारखे ५० किंवा ६० डॉलर नाही पाहिजे. परंतु, १६० रुपयांत १६ जीबी डेटा प्रत्येक महिन्याला देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता १० रुपयात मिळणाऱ्या १ जीबी डेटासाठी १०० रुपये मोजावे लागतील.
सध्या ह्या आहेत किंमती
एअरटेल १९९ रुपयात २४ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा ऑफर केली आहे. डेटा बेनिफिट्स १० पट कमी होऊन २.४ जीबी होईल.त्याचप्रमाणे कमीत कमी रिचार्ज १०० रुपये महिना असेल. सध्या एअरटेलच्या बेस प्लानची किंमत ४५ रुपये महिना आहे.आणि ती वाढून 100 रु होणार आहे.
रिवेन्यू वाढवणे आवश्यक आहे
सुनिल मित्तल पुढे म्हणाले की, इंडस्ट्रीला स्थिर बनवण्यासाठी ३०० रुपये एव्हरेज रिवेन्यू वर युजर (ARPU) ची आवश्यकता आहे. पुढील सहा महिन्यात आम्ही २०० रुपये (ARPU) स्तराला निश्चित करण्यासाठी पोहोचू. तसेच २५० रुपये साधारणपणे एआरपीयू असेल.






