Amalner

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एका निबंध स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या तर्फे घेण्यात आले …

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एका निबंध स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या तर्फे घेण्यात आले …

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalner : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर तर्फे दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले . तसेच महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा अमळनेर शहरातील लोकमान्य विद्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य केले होते. तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन नाही या स्पर्धेत यावेळी करण्यात आले. यावेळी शहर मंत्री निलेश पवार, सह मंत्री प्रितेश पाटील, प्रताप महाविद्यालय प्रमुख केशव पाटील, जळगाव जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, हितेश पाटील, अमोल पाटील, वैभव पाटील, पवन सातपुते, अश्विनी पाटील, कृष्णा पाटील, मनीष ब्रम्हे वैष्णवी पाटील, निकिता पाटील, आदी कार्यकर्त्यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button