Maharashtra

भारतीय बाजारपेठ मजबूत ,उद्योग रोजगार  राहणार शाबूत  माञ आर्थिकस्थिती बिघडणार

भारतीय बाजारपेठ मजबूत ,उद्योग रोजगार राहणार शाबूत माञ आर्थिकस्थिती बिघडणार

प्रतिनिधी सुरेश बागडे

सध्या कोरोना विषाणू चा फैलाव प्रादुर्भाव भारतात जास्त प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रातील मुंबई सह राज्यातील गावखेड्याला कोरोना विषाणू ने कवेत घेतल्याचे चिञ जाणवते आहे. या साथरोगामुळे राज्यात मृत्यू दर वाढला आहे. आपण लाॕकडाऊनच्या अंतिम टप्प्यात आहोत केंद्र राज्य शासन सर्वोतोपरी कोरोना ला आवर घालत आहे परिस्थिती काही दिवसानंतर व्यवस्थित होईल अशी आशा आहे.

कोरोना विषाणू वर आपण विजय मिळवणार त्याचा नायनाट करणार हे नक्की आहे .

माञ आम्ही सर्व भारतीय काळजी करत आहोत की आमचा उद्योग,व्यवसाय व रोजगार ,नोकरी चे काय होणार ?

कोरोना संकटामुळे आर्थिक मंदी येणार ,कारखान्यातील ,कार्यालयातील नोकरी जाणार ,उद्योगावर कुर्हाड येणार उत्पादन बाजारपेठ ठप्प होणार ?

असे अनेक प्रश्न प्रत्येक व्यक्ती ला चिंतीत करत आहेत.

कोरोना प्रादुर्भाव प्रसारामुळे उद्योग व्यवसाय अङचणीत आहेत पण बंद केलेले नाहीत .मूळातच आपली भारतीय बाजारपेठ मजबूत आहे सर्व आर्थिक बाबींचा सामना करण्यास सक्षम आहे.

जगातील 15 मोठ्या अर्थव्यवस्था मध्ये भारत ही देखील एक मोठी विकसीत अर्थव्यवस्था आहे.

कोरोना विषाणू चा भारतीय बाजारावर परिणाम होणार हे निश्चित आहे पण त्यातून आपण मार्ग काढू शकतो.

त्यासाठी प्रत्येकाने आर्थिक नियोजन करणे अपेक्षित आहे श्रीमंत असो अथवा सामान्य सर्वांनाच पैशाची काटकसर करावी लागणार.

औद्योगिक उत्पादनात गरजेनुसार कच्चामाल खरेदी ,नियोजनबध्द मार्केटींग ,उत्पादनाची साठवणूक नसावी,वाहतुक खर्चावर नियंत्रण ,बाजारातील चढउतार शोध,कर्मचाऱ्यांची एकाग्रता शिस्त व अनावश्यक खर्चाला फाटा दिला तर उद्योगांना आर्थिक संकट भेडसावणार नाही.

भारतीय अर्थव्यवस्था, बाजारपेठ व रोजगार खालील उद्योगामुळे मजबूत व शाबूत आहे.

*1)औषधे ,सौंदर्य प्रसाधने*

सामान्य औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठा करणारा देश म्हणून भारताची जगभर ओळख आहे.पॕरासीटामाॕल, बी1,बी6,बी 12,फाॕर्मुलेशन औषधाची निर्मिती व निर्यात मोठ्या प्रमाणात होते.तसेच भारतीय सौंदर्य प्रसाधने जगभर मागणी असते.

देशांतर्गत विक्री मोठी आहे.

*2) कृषी अन्न धान्य व अन्नप्रक्रिया उद्योग*

कृषी अन्न धान्य बाबतीत आपण नेहमीच अग्रेसर असतो आपल्या कडे धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व धान्य प्रक्रीया केली जाते त्यात आपण स्वयंपूर्ण आहोत.

*3)बांधकाम साहीत्य ,खाण*

सिमेंट,स्टील ,मेटल ,पेंट

बांधकाम साहीत्यात आपण स्वतः उत्पादन करतो .लोखंड धातू ,दगडखाणी ,पेंटींग रसायणे ,फरश्या ,फर्नीचर चे लाकूड मुबलकता आहे.त्यातून आपल्या देशाला मोठा आर्थिक लाभ होतो तसेच निर्यात देखील होते.

*4)यंञसामग्री व यांञिक प्रक्रिया उत्पादन*

विविध प्रकारची कारखान्यात कंपनीत वापरली जाणारी अवजड वैशिष्ट्येपूर्ण यंञसामग्री व यांञिक प्रक्रिया करणाऱ्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहोत.

*5) आयुर्वेदीय उत्पादने*

भारतीय आयुर्वेदीय उत्पादनाला जागतीक बाजारात मोठ स्थान आहे.त्यात आयुर्वेदीक जडीबुटी औषधे समाविष्ट तसेच दंतमंजन,पेस्ट,आयुर्वेदीक अंगदुखी क्रीम ,डोकेदुखी क्रीम मागणी असते.

*6)ईलेक्टाॕनिक्स मार्केट*

या बाजारपेठेत चीनची मक्तेदारी होती पण सध्या भारत ईलेक्टाॕनिक क्षेञाच्या बाबतीत जगातील मोठी उद्योन्मुख बाजारपेठ आहे.ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेत भारत पाचव्या क्रमांकावर विराजमान होत असल्याचे चिञ आहे.संशोधन,दर्जा ,किंमत ही ञिसुञी वापरल्यामुळे फायदा.

*7)टेक्नाॕलाॕजी व हार्डवेअर*

टेक्नाॕलाॕजी व हार्डवेअर उत्पादनात आपण नविन संशोधन विकसीत केले आहे.सर्वच प्रकारच्या व्यवसायात लहान भाग ,जोड देण्यासाठी ,आकार देण्यासाठी हार्डवेअर व टेक्नाॕलाॕजी अत्यावश्यक असते त्यात स्वयंपूर्ण आहोत ,देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष मागणी .

*8)वाहन उद्योग व पुरवठा*

देशाच्या प्रगतीमध्ये वाहन व्यवसायाचा वाटा मोठा आहे.

सध्या सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणून वाहन उद्योगाकडे पाहीले जाते. त्यात कोरोना प्रादुर्भाव चा थोडा परिणाम जाणवतो .अॕटोमोबाईल उत्पादक व अॕटोमोटीव्ह पुरवठादार सध्या सुटेभाग आपलेकडे सहज उपलब्ध होत नसल्यामुळे विचारात आहेत .माञ सध्या स्थानिक पातळीवर वाहानांच्या सुट्या भागांचे उत्पादन निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक झाले .काही प्रमाणात सुटेभाग तयार केले जातात पण मागणी प्रचंड असल्यामुळे पुरवठा शक्य होत नाही .अनेक बड्या उद्योजकासह केंद्रशासनाने सुध्दा वाहन उद्योगाकडे विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

*9)सेवा क्षेत्र व कंपन्या*

सध्याच्या घडीला सेवा क्षेत्रातील कंपन्यांची बाजारपेठ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर फार विस्तीर्ण आहे. अनेक सेवा देणाऱ्या कंपन्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत असतात .त्यांना माञ कर्मचारी वर्ग आवश्यकच असतो कोरोना परिस्थिती मुळे सेवाक्षेञाला पुनर्रजीवीत करावे लागेल .भारतीय अर्थव्यवस्था बळकटीकरण करण्यात सेवा क्षेञ आघाडीवर असते.

*10)टेक्सटाईल कंपन्या / कापड बाजार*

आपल्या देशात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते आपसुकच सुत गिरण्या ,कारखाने ,कापड मिल ची संख्या जास्त असून उत्पादन मोठे आहे.सध्याच्या कोरोना पार्श्वभूमी वर कापड बाजारावर संकट कोसळल्याचे दिसते आहे .तथापि कपडा अत्यावश्यक मानवी गरज असल्यामुळे या उद्योगाला चालना देणे महत्त्वाचे आहे.काही महीन्यामध्ये कापडबाजार पूर्वपदावर येईल .

अशा प्रकारे जरी आपल्या देशावर कोरोना विषाणू मुळे भयंकर संकट ओढवले असले तरी आपली सर्वच क्षेत्रातील उत्पादनाची बाजारपेठ मजबूत आहे .तसेच उद्योग ,व्यवसाय व कंपन्यात ,खासगी क्षेत्रातील कारखान्यात काम करणारे व्यवस्थापक , अभियंता ,तंञज्ञ ,कर्मचारी ,कामगार यांना जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारतीय उद्योजक ,केंद्र शासन ,राज्य शासन यांनी भारतीय बाजारपेठ मजबूत तर उद्योग ,रोजगार नोकरी शाबूत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले असल्याचा विचारवंताकडून कयास बांधला जात आहे.

सध्याच्या कोरोनाला परिस्थिती ला तोंड देण्यासाठी काही उद्योजकांनी व्हेंटीलेटर,पीपीई किटस,हँडग्लोव्हज, कोरोना उपचार साहीत्य ,सॕनीटायझर,एन95 मास्क ,विविध अत्यावश्यक औषधाचे उत्पादन सुरु केले आहे.आपल्या भारतीयासाठी ही अभिमानाची व जमेची बाजू आहे. तसेच देशातील उद्योजक ,सर्व च क्षेत्रातील कर्मचारी ,कामगार यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल पण भारतीय बाजारपेठ मूळातच सर्वांगाने मजबूत असल्यामुळे उद्योग व रोजगार शाबूत राहतील.

नितीन जाधव
जनसंपर्क अधिकारी
तथा मंञालय मुख्य संपर्कप्रमुख
महा.राज्य पञकार संघ,मुंबई.
मो9326398001

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button