Kolhapur

शिक्षक भारती सांगली चे कोल्हापूर उपसंचालकाना विविध मागण्यासाठी निवेदन

शिक्षक भारती सांगली चे कोल्हापूर उपसंचालकाना विविध मागण्यासाठी निवेदन

कोल्हापूर-सुभाष भोसले
कोल्हापूर विभागातील पाचही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या समस्या निराकरणासाठी शिक्षण प्रशासन गतीमान केले आहे.असे आश्वासन
शिक्षण उपसंचालकसो सत्यवान सोनावणे यांनी शिक्षक भारती टीमला दिले
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे, सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, राज्य संघटक फैजल पटेल, सल्लागार जे. एस पाटील अप्पा व महावीर सौंदत्ते यांनी सत्यवान सोनावणे यांची त्यांच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात भेट घेऊन प्रथम शिक्षक भारतीच्या वतीने त्यांचा सत्कार केला.त्यांनी संघटनेचे पदाधिकारी यांचे बरोबर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमोर सविस्तर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे एकोणीस प्रश्न मांडले. त्यांना दिलेल्या निवेदनाचे पीडीएफ फाईल याठिकाणी टाकले आहे. त्यामध्ये विनाअनुदानित शाळा, तुकड्या यांना तातडीने अनुदान सुरू करणे, वयानुसार शंभर टक्के अनुदान लागू करणे, पाचही जिल्ह्यातील पे युनिट कडून डीसीपीएस फरक पहिला हप्ता रोखीने व भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करणे,मार्च २०१९ अखेरच्या पावत्या देणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती पडताळणी, शालार्थ आयडी प्रस्ताव मंजूरी, प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व प्रलंबित कामे निकाली काढणे, शिक्षण विभागाकडे प्रलंबित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे तक्रार अर्जावर तातडीने निर्णय घेणे, वरिष्ठ व निवड श्रेणी मंजुरी, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे सुधारित पेंशन प्रस्ताव मंजुरी, वेतनेतर अनुदान रक्कम शाळांच्या खात्यावर तात्काळ जमा करणे, तासिका तत्त्वावरील व अर्धवेळ शिक्षकांना हमीपत्रावर तातडीने वेतन अदा करणे, वाढीव व व्यपगत पदे मंजूर करून त्यांचे वेतन सुरू करणे, इ. ११वी व १२वी नवीन अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रशिक्षण एप्रिल /मे २०२०पूर्वी बोर्डाकडून आयोजित करणे, शिक्षण सेवकांचे मानधन वाढविणे, आयटी शिक्षक वेतन मंजूरी, ६व्या वेतन आयोगानुसार डीसीपीएस फरक पहिला हप्ता रोखीने जमा करणे, अल्पसंख्याक माध्यमिक शाळेतील विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे मान्यता प्रस्ताव मंजूर करणे, ग्रामीण भागातील शाळांसाठी पोषण आहार मध्यवर्ती किचन योजना तात्काळ सुरू करणे. शालार्थ आयडी मिळूनही ज्यांचे पगार सुरू नाहीत ते सुरू करणे, ऑफलाइन पद्धतीने सादर झालेली सर्व पगार बिले आठ दिवसात खात्यावर जमा करणे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षणाधिकारी, वेतन पथकाचे अधीक्षक व लेखाधिकारी यांची तात्काळ बैठक घेऊन सर्व कामकाज आढावा घेऊन कालमर्यादेत नमस्कार सर्व प्रलंबित कामाचा निपटारा करणे. पाचही जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे सर्व प्रश्न सोडविणे व शिक्षण क्षेत्र स्वच्छ आणि पारदर्शी लक्षपूर्वक आमच्या समस्या ऐकून घेतल्या. शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने त्यांचे अभिनंदन करणेत आले यावेळी
प्रा. एन. डी. बिरनाळे.

शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा एन डी बिरनाळे
सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने
राज्य संघटक फैजल पटेल
सल्लागार जे.एस पाटील अप्पा ,महावीर सौंदत्ते
उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button