कोरोना धोका टाळण्यासाठी किल्लारीत ग्रामपंचायत कडून जंतुनाशक फवारणी
औसा प्रतिनिधी प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
औसा तालुक्यातील किल्लारी येथे ग्रामपंचायतच्या वतीने गावात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
किल्लारीत ठिकठिकाणी जंतू नाशकाची फवारणी केली जात आहे.
किल्लारी मध्ये संचारबंदीचे नियम पाळले जात असून ग्रामपंचायत प्रशासन कंबर कसून कोरोना संदर्भात उपाय योजना करीत आहेत.
यासाठी सरपंच शैलाताई लोहार, माजी सरपंच युवराज गायकवाड, शिवसेनेचे किशोर जाधव, व ग्रामपंचायत च्या सर्व सदस्या च्या सहकार्याने हा उपक्रम सूरु करण्यात आला आहे. सर्वप्रथम किल्लारी ग्रामीण रुग्णालयापासून सुरुवात करण्यात आली व फवारणी दरम्यान घरातील व्यक्तींने घराबाहेर पडू नये, घरात कुणाला सर्दी ,ताप, खोकला असल्यास लवकरात लवकर रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे असे सांगण्यात आले,यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप लोहार, ग्रामपंचायत सदस्य पप्पू बालकुंदे,सूर्यकांत बाळापुरे, विश्वनाथ गुंजोटे, किशोर भोसले, शाहूंराज वाळके, लालू पठाण, संजय कोराळे, पांडुरंग भोसले आदी उपस्थित होते.






