लातूर येथे शेतकरी संघटनेचे राख- रांगोळी आंदोलन
लातूर प्रतिनिधी : – प्रशांत नेटके
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीपाच्या पिकांना सरसकट कोणत्याही प्रकारच्या पंचनाम्याची औपचारिकता न करता ५०,०००/- रु.नुकसान भरपाई द्यावी.खरीप पिकांना १००% पिक विमा लागू करावा,आणी कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी.या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे,माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, तालुकाध्यक्ष किशनराव शिंदे, अशोक भोसले, किशोर महाराज शिवणीकर, दगडूसाहेब पडीले, हरिश्चंद्र सलगरे, वसंत कंदगुळे,कालीदास भंडे, संतोष पताळे, गोविंद भंडे, सोपान सुरवसे, गुंडेराव उमाटे,दत्तु कंदगुळे,शंकर निला,दत्ता भोयबार, गोवर्धन गाडेकर,गणेश कंदगुळे, अजिंक्य पाटील,कालीदास डांगे,आदिंसह शेतकरी उपस्थित होते.






