Pune

गाय, म्हैस,व शेळी मधील प्रजनन व्यवस्थापन” उत्साहात आँनलाईन प्रशिक्षण

गाय, म्हैस,व शेळी मधील प्रजनन व्यवस्थापन” उत्साहात आँनलाईन प्रशिक्षण

पुणे / प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

कोरोना संक्रमण काळात शेतकऱ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत मुंबई पशुवैद्यक
महाविद्यालय,परळ, मुंबई तर्फे पशु प्रजनन व प्रसूती शास्त्रविभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या तज्ञांच्या सहाय्याने कोरोना संक्रमण काळात महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच दिवसीय मोफत ऑनलाईन पद्धतीने किफायतशीर “गाय, म्हैस,व शेळी मधील प्रजनन व्यवस्थापन” प्रशिक्षण २०२० दि. २४ .०६.२०२० ते २८.०६.२०२० रात्री ८ ते ११.०० वाजता आयोजित करण्यात आले होते .
सध्या कृषी क्षेत्रातून अपेक्षित उत्पन्न मिळणे अवघड आहे किंवा कमी उत्पन्न मिळत आहे म्हणून पशुपालन या उद्योगधंद्याकडे आकर्षित कारण्यासाठी व ठोस उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी बोलावता येत नसल्यामुळे कोरोना संक्रमण काळात मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण आयोजित केले होते.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात किंवा इतर पशुसंवर्धन प्रशिक्षण संथांना भेट देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेणे शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी त्यांच्या मागणी आणि सवडीनुसार पाच दिवसीय मोफत ऑनलाईन पद्धतीने किफायतशीर “गाय, म्हैस,व शेळी मधील प्रजनन व्यवस्थापन” प्रशिक्षण आयोजित केले होते. आजच्या माहिती तंत्रज्ञान युगातले शेतकरी GOOGLE MEET आणि youtube वर “गाय, म्हैस,व शेळी मधील प्रजनन व्यवस्थापन” प्रशिक्षण घेत होते. दर दिवशी कार्यक्रमाची लिंक शेतकऱ्यांना ई-मेल,Whatsapp,फेसबुक द्वारे पाठविण्यात येई . प्रशिक्षणाच्या शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येत होती.या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक डॉ.अजित रानडे, सहयोगी अधिष्ठाता,मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय हे होते.

या पाच दिवसीय मोफत ऑनलाईन पद्धतीने किफायतशीर प्रशिक्षणाचे संयोजक डॉ. सरिता गुळवणे, प्राध्यापक तसेच प्रमुख समन्वयक डॉ. रवींद्र चौधरी, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक समन्वयक डॉ. संदीप गायकवाड, डॉ. राजू शेलार, डॉ. निलेश डगली हे सर्व तज्ज्ञ प्राध्यापक पशू प्रजनन व प्रसूतिशास्त्र विभागातील आहेत .तांत्रिक समितीमधील सदस्य महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. दत्तात्रय कदम, डॉ. धनंजय पावलकर, डॉ. मनिष सावंत आणि डॉ.सलील हांडे यांनी GMEET आणि YOUTUBE वर ऑनलाईन प्रशिक्षण सुरळीत सुरु राहण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक डॉ. हिराचंद पालमपल्ले, डॉ.सलील हांडे ,डॉ.सुरेश जगदाळे, डॉ. विक्रांत पवार, डॉ. विलास वैद्य डॉ. कातकडे आणि डॉ. संजय कदम यांनी कार्यक्रमात समन्वयक व तज्ञ म्हणून पशुप्रजननवर उत्कृष्ट मार्गदर्शन करून पशुपालनातील नव उद्योजक ,युवा मंडळी, महिला बचत गट यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयातील तज्ज्ञ बरोबर पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र राज्य येथील तज्ञ डॉ. राहुल संखे, डॉ. हेमंत पिचड आणि डॉ. विनीत गोंडके, पशुधनविकास अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी देखील पशु पालकांना मोलाचे मार्गदर्शन करून पशुपालन एक उत्कृष्ठ व फायदेशीर जोडधंदा म्हणून अधोरेखित केले. प्रशिक्षण झाल्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रश्न मंजुषा पाठवण्यात आली जी शेतकऱ्यांनी भरून पाठवायची आहे .तसेच शेतकऱ्यांचा अभिप्राय देखील ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आला आहे . उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी यांना e-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकर्यां साठी एवढ्या कालावधी व वेळेचा बहुधा असा हा देशातील व राज्यातील पशुसंवर्धन विस्तार शिक्षणातील नवीन व मोजका उपक्रम आहे. कोरोना(Covid19) संक्रमण काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे ते आणि त्यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ तेथील तज्ञ यांचे अरूण पारधी यांनी आभार मानले आहेत .
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातून १०० हुन अधिक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने पाच दिवसांचे प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. ह्यामध्ये (पुणे,नगर,नाशिक,पालघर,ठाणे,रायगड मधील) 57 आदिवासी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button