Amalner

माजी पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांचे शिरिषदादा मित्र परिवारातर्फे अमळनेरात स्वागत..

माजी पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांचे शिरिषदादा मित्र परिवारातर्फे अमळनेरात स्वागत..

बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा जळगांव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब नवनिर्धार संवाद अभियान अंतर्गत दौऱ्यानिमित्त अमळनेर येथून जात असतांना मा.आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने दगडी दरवाजा, राजे संभाजी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले.प्रसंगी नगरसेवक भाऊसाहेब महाजन, धनंजय महाजन,बाळासाहेब संदानशिव,संतोष लोहेरे,माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी आदींसह पराग चौधरी, ब्रिजलाल पाटील,रुणाल पाटील,विक्की चौधरी,गणेश मराठे, भूषण अहिरराव,चेतन चौधरी,भूषण भोई राकेश चौधरी मित्र परिवाराचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.दगडी दरवाजा कामा ची माहिती देखील या प्रसंगी प्रा. ढोबळे साहेबांनी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांचा कडून जाणून घेतली व येथील मातंग समाजाचे ग्राम दैवत मांगीर बाबा यांचा स्मारक विषयी देखील सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली.सदर स्मारक व दरवाजा पूर्ण झाल्यावर नक्की भेटण्यास येईल असे आश्वासन देत पुढील दौऱ्या साठी रवाना झाले. प्रा. ढोबळे साहेबांचा सोबत बहुजन रयत परिषदेचा महिला प्रदेश अध्यक्ष ऍड.कोमल ताई साळुंखे,प्रदेश अध्यक्ष रमेशतात्या गालफाडे सह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी देखील .होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button