बिग बीं ची भिंत पुन्हा चर्चेत..! मुंबई महानगरपालिकेच्या कार्यवाही कडे लक्ष केंद्रित…
मुंबई चित्रपट सृष्टी तील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत अतिक्रमण मध्ये येत आहे आता या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या भिंत गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय आहे. आता पुन्हा एकदा ही भिंत चर्चेत आली आहे ती लोकायुक्तांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्यावरुन मुंबई महापालिकेला प्रश्न विचारला आहे.अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरत आहे रस्ते रुंदीकरणासाठी 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली होती. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही, याबाबत काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती.
मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. रस्त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीचा काही भाग तोडणं गरजेचं असल्याचा अहवाल सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात दिला होता. तरी देखील मुंबई महापालिकेनं कोणतीच कारवाई केली नसल्यानं काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती. आता मुंबई महापालिका लोकायुक्तांना अहवाल सादर करताना कोणती सबब देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांच्या अर्जावर लोकायुक्तांची सुनावणी नुकतीच पार पडली. पालिकेनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीसंदर्भात काय अॅक्शन घेतलीय याची माहिती लोकायुक्तांनी मागवली आहे. 2017 पासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत येत असल्यानं ही भिंत हटवण्याबाबतची ही नोटीस आहे. परंतु 2017 पासून प्रतिक्षा बंगल्यासंदर्भात पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. पालिकेनं दिलेल्या नोटीसनुसार, कारवाई करत नाही, याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुर्कांकडे अर्ज केला होता.प्रतीक्षा बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या भिंतीवर कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.






