Ahamdanagar

श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे विधवा, परित्यक्ता व अपंग महिलांना किराणा वाटप आणि उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे विधवा, परित्यक्ता व अपंग महिलांना किराणा वाटप आणि उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्ष्रेत्र हनुमान टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते स्व.आसाराम राधाकृष्ण गायकवाड यांच्या अकराव्या पुंण्यतीथी निमित्ताने गावातील विधवा, परित्यक्ता, अपंग महिलांना किराणा मालाच्या किटचे वाटप आणि गणपती उत्सवाच्या काळात उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या निमित्ताने सामाजिक उपक्रमा बरोबर अन्नदानही करण्यात आले. स्व.आसाराम गायकवाड हे चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते होते. गावपातळी पासून तर थेट व्रुद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील आदिनाथ नागरी पतसंस्थेच्या व्हा.चेरमन पदापर्यंत त्यांनी अतिशय उत्तम काम केले.आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी जनसेवेचे काम आजपर्यंत अविरतपणे सुरु ठेवले आहे.थोरला मुलगा मुकुंद यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना बचतीचा मार्ग दाखवून दिला आहे.डॉ. विठ्ठल गायकवाड हे अपंग आहेत त्यांनी दीव्यांग व्यक्तीची सेवा घडावी म्हणून अपंगत्व आलेल्या व्यक्तीचे रक्त, लघवी मोफत तपासून देण्याचे व्रत हाती घेतले आहे. कै.आसाराम गायकवाड यांचे बंधू विष्णु गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे उत्तम कार्य करत आहेत.त्यांचा मुलगा योगेश हाही सामाजिक कामात व्यस्त राहून जनसेवेचे काम करीत आहे. गायकवाड कुटुंबाने पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्याचा चांगला ठसा उमटवला आहे. या सोहळ्यासाठी गावच्या सरपंच सौ मिनाताई शिरसाठ, सोसायटीचे चेरमन अशोक काजळे,खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाषराव बर्डे, व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे, चारुदत्त वाघ,माजी सरपंच बाबासाहेब बर्डे,ज्ञानदेव लबडे,अजय रक्ताटे,अंकुश डांभे,नवनाथ वाघ,रामदास बर्डे,अण्णासाहेब दगडखैर, शिवाजी मुळे, शिवनाथ दगडखैर, संभाजी दगडखैर, अँड.लक्ष्मण पोकळे,विजय हजारे, देविदास साळुंखे, निलेश काजळे यांच्या सह परिसरातील अनेक मांन्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button