Jalgaon

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रत्नागिरीचे SP प्रवीण मुंढे यांची नियुक्ती..

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रत्नागिरीचे SP प्रवीण मुंढे यांची नियुक्ती..

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील

जळगाव : काही महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगली होती. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर त्याच्या जागेवर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अखेर प्रवीण मुंढे यांची बदली करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दबंग कामगिरी नंतर जळगाव जिल्ह्यात त्यांची झालेली बदली निर्णायक ठरणार आहे.

जिल्ह्यातील विविध भागात वाढती गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कामकाजाचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. जिल्हात सध्या कोरोनाचा आपत्ती काळ असताना देखील गुन्हेगारी कळस हा वाढता आहे. तरुण तडफदार अधिकारी असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अधिक कल असेल असे सांगितले जाते आहे.

प्रवीण मुंढे यांची थोडक्यात माहिती:>
◆ प्रवीण मुंढे यांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाले आहे.

◆मुंढे यांनी तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ, नवी मुंबई येथे पूर्ण केले आहे.

◆त्यांचा जन्म 1985 साली झाला आहे. ते मुळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत.

◆ मुंढे यांनी 2015-2016 या साली नाशिक येथील कुंभमेळा मध्ये आपली मुख्य जबाबदारी पार पाडली आहे.

◆2017 साली पुण्यात वाहतूक विभागात सुध्दा जोरदार कामगिरी बजावली आहे.

◆ मुंढे हे 2012 ला आय पी एस अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.

◆मुंढे हे रत्नागिरी येथे कार्यरत होते. त्यांची बदली आता जळगाव येथे झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button