Pune

इंदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती इंदापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन

इंदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती इंदापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर तालुक्यातील मौजे आनंदनगर ता. इंदापूर येथील दलित समाजात ये जा करणारा रस्ता हा तेथील धनदांडग्या, राजकीय पुढाऱ्यांकडून जाणीव पूर्वक अतिक्रमण करून अडवला गेला आहे. यासंबंधी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, कागदपत्रे सादर करून देखील व मा.उपविभागीय अधिकारी सो.बारामती,मा.तहसीलदार सो. इंदापूर यांचे कारवाईचे आदेश दिले असताना देखील मा.गटविकास अधिकारी इंदापूर व त्यांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे या प्रकरणात जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकारी वर्गाकडून मदतच करीत आहेत असे दिसते आहे असे अरोप करीत वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे
संबंधित दोषींवर व अधिकारी, कर्मचारी यांच्या दलित अत्याचार विरोधी कायदा (अट्रोसिटी ऍक्ट) नुसार कारवाई करण्यात यावी ही मागणीही वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी इंदापूर शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संदीप मोहिते, भटक्या विमुक्त संघटना चे अध्यक्ष तानाजी धोत्रे , रिपब्लिकन क्रांती सेना चे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे , इंदापूर तालुका कांग्रेस कमिटी सचिव महादेव लोंढे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button