भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुक्तिभूमि येथे भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=येवला शहरातील मुक्तीभूमी येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव दिपक गरुड व आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते भगवान साबळे यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करुन भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली
यावेळी राम कोळगे, शशिकांत जगताप यांनीही मार्गदर्शन केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला बुद्ध कळाले तसेच
भैय्यासाहेबामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार घरा घरात पोहचले बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर चैत्यभूमीचे शिल्पकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष, बौध्दाचार्याचे जनक भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार, आचार, धम्म उपदेश शांती व करुणा मार्गाने पुढे येत लोकापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य केले त्यामुळे आज विज्ञानवादी धम्म माणसाचा आचरणात दिसून येत असल्याचे मनोगत यावेळी दिपक गरुड यांनी व्यक्त केले
यावेळी सुत्रसंचालन
रवि सोनवणे यांनी केले तर आभार मूक्तारभाई तांबोळी यांनी मानले
यावेळी दिपक गरुड, शशिकांत जगताप, भगवान साबळे, राम कोळगे, मूक्तार तांबोळी, पोपट खंडागळे, समाधान मोरे, दयानंद जाधव, संजय पगारे, वसंत सोनवणे , भिकण साळवे , साहेबराव भालेराव आदी उपस्थित होते






