Amalner: सुभाष चौकातील सट्टा पेढीवर पोलिसांचा छापा..!
अमळनेर पोलिसांनी शहरातील सुभाष चौकात सुरू असणाऱ्या सट्टा पेढीवर छापा टाकत कारवाई केली.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुभाष चौकात असणाऱ्या भारत सायकल मार्टच्या आडोशाला सट्टा पिढी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पो ना रविंद्र पाटील, दीपक माळी, पो कॉ सिद्धांत शिसोदे आदींनी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता राजेश रमेश शिंदे (रा.मोतीलाल नगर ढेकू रोड अमळनेर) हा त्याठिकाणी सट्टा पेढी चालविताना आढळून आला.त्याच्याकडून 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो ना रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






