Amalner

Amalner: महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना ग्रामीण भागातून भरघोस प्रतिसाद

Amalner: महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना ग्रामीण भागातून भरघोस प्रतिसाद

अमळनेर:- महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून त्यादरम्यान त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
८ रोजी तालुक्यातील अंतुर्ली- रंजाणे, खापरखेडा- अंबारे, करणखेडा, तासखेडा, आमादे, नंदगांव, लडगांव, दरेगांव, हिंगोणे बु, मुडी, पिंगळवाडे, गलवाडे बु., खु., सबगव्हाण, झाडी या गावात प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठिकठिकाणी माता भगिनींनी ओवाळून आशीर्वाद दिले. ग्रामस्थांनी ही प्रचारात सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला. तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मतदारसंघात यंदा पुन्हा परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल शिंदे यांना विजयी करा असे आवाहन डॉ. शिंदे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button