ब्राम्हणशेवगे येथील युवकांची गरुड झेप : राहुल मोरेची तहसीलदारपदी निवड
ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव
प्रतिनिधी सोमनाथ माळी
येथील युवकाने परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम व प्रयत्नांमुळे गगन भरारी घेत आपले ध्येय साध्य करत आपल्या कुटुंबाचेच नाही तर ब्राम्हणशेवगे गावाचेही नाव उंचावले आहे. काल राज्यसेवा परिक्षेचा एम.पी.एसी.चा निकाल जाहीर झाला. यात राहूल मोरे ने पुर्ण महाराष्ट्रात ११६ रॅक मिळवत यश संपादन केले आहे.
आई वडील दोन्ही शेती करतात.वडिलांचे शिक्षण अल्प आहे.तर आई ९ वी शिकलेली आहे. राहुल चे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण ब्राम्हणशेवगे गावात झाले आहे.दहावीला राहुलला ७१ % मार्क होते तर १२ वी नांदगाव जि. नाशिक येथे विज्ञान शाखेतून केली.काही आरोग्य विषयक समस्यांमुळे फक्त ४८ % मार्क पडले .त्यामुळे राहुलने राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे बीसीए करण्याचा निर्णय घेतला.तेथे दुसऱ्या वर्षाला पहिला आला होता. तिसऱ्या वर्षी राहुल विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आला होता.शिक्षण पूर्ण झाल्यावर सामाजिक शास्त्रातील आवड व महसूल प्रशासनाच्या भाग होण्याची इच्छा म्हणून एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला.सुरुवातील दोन वर्ष अपयश आले.पण २०१७ पासून मुलाखत पर्यंत जात होतो पण थोडक्यात यश हुलकावणी देत होते.ह्याच कालावधीत माझी मार्च २०१९ ला सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात निवड झाली.नोकरी करताना मी पुन्हा राज्य सेवा दिली व माझे ध्येय असलेली पोस्ट तहसीलदार मला प्राप्त झाली.असे मत राहुल मोरे याने मांडले.
राहुल मोरे यांची तहसीलदार पदी निवड झाल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संकलन-
*सोमनाथ माळी*






