Maharashtra

लॉक डाऊन काळात काम करणारे कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल विभाग व पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यासह सर्व

प्रतिनिधी नितीन माळे

सरकारी घटकांसह सेवा देणारे स्वयंसेवक यांचा विमा उतरविणेची खासदार उन्मेश दादा पाटील यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडे मागणी

जळगाव कोरोना विषाणू कोविड १९ या आजाराशी लढा देण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविका व संबधित घटकांचा ज्या पद्धतीने केंद्र सरकारने ५० लाख रुपये रकमेचा विमा उतरविला आहे. राज्य सरकारने याच पद्धतीने राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्वच महसूल व आरोग्य विभाग तसेच पोलीस कर्मचारी, व ग्रामपंचायत कर्मचारी यासह लॉकडाऊन काळात कोरोना विषाणू या आजारावरील संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सरकारी घटकांसह सेवा देणारे स्वयंसेवक यांचा देखील २५ लाख रुपये रकमेचा विमा उतरविण्यात यावा. अशी आग्रही मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडे केली आहे.
विशेषतः राज्यात जिल्हा बंदी असल्याने पोलीस प्रशासनाने आहे त्या पोलीस बळाचा वापर करत जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे व गावपातळीवर वित्त आयोगाच्या निधीतून गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषित केलेल्या १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज मधील मदत संसर्ग टाळण्यासाठी जनतेला घरपोच सेवा देण्याकरिता महसूल विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. या सर्व घटकांनी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. या करिता या सर्व घटकांचा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने 25 लाखांचा विमा उतरविण्यात यावा. अशी विंनती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडे केली आहे . तसेच राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचा २५ लाख रुपये रकमेचा विमा उतरविण्याचे धोरण स्वीकारले या बद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे अभिनंदन केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button