Amalner

Amalner: लायन्स एक्स्पोचे आज उदघाटन…अमळनेरकरांसाठी नववर्षाला रंगारंग मनोरंजनासह खानपानाची मेजवानी

Amalner: लायन्स एक्स्पोचे आज उदघाटन…अमळनेरकरांसाठी नववर्षाला रंगारंग कार्यक्रमांसह खानपानाची मेजवान

अमळनेर:

येथील लायन्स क्लबतर्फे आयोजित लायन्स एक्स्पो चे आज 6 तारखेस दुपारी ४ वाजता उदघाटन होणार आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोर लायन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये अनेक रंगारंग कार्यक्रम, विविध व्यावसायिकांचे खानपानाचे स्टॉल्स यांची रेलचेल राहणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील उदघाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उदघाटन करतील. क्लबचे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया ,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार स्मिता वाघ प्रमुख अतिथी असतील.

कार्यक्रम रूपरेषा:

  • ६ जानेवारीस रात्री ८ वाजता अमित सोलंकी यांचा मॅजिक शो
  • ७ जानेवारीस रात्री ८ वाजता डान्स इंडिया डान्सचा उपविजेता तनय मल्हाराचा डान्स शो
  • ८ जानेवारीस रात्री ८ वाजता मी होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार फेम, विक्रांत राजपूत यांच्यासह किंग गाईज ग्रुप म्युझिक शो
  • ९ जानेवारीस रात्री ८ वाजता प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थांचे ‘मेनूपॉज’ हे नाटक

यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य लकी ड्रॉ आयोजित केला असून यात बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्लबचे अध्यक्ष योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, खजिनदार अनिल रायसोनी, प्रोजेक्ट चेअरमन नीरज अग्रवाल, क्लबचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. ख्यातनाम बिल्डर ओमप्रकाश मुंदडा, बजरंग सुपर मॉलचे संचालक बजरंगलाल अग्रवाल,खा.शि.मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे,रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना,महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांचे सहकार्य लाभले आहे.

Amalner: लायन्स एक्स्पोचे आज उदघाटन...अमळनेरकरांसाठी नववर्षाला रंगारंग मनोरंजनासह खानपानाची मेजवानी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button