Karnatak

? चार राज्यांना जोडनाऱ्या पुलाची पाच वर्षांपासून दुरावस्था..प्रशासनाचे दुर्लक्ष..

चार राज्यांना जोडनाऱ्या पुलाची पाच वर्षांपासून दुरावस्था.. प्रशासनाचे दुर्लक्ष..

हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर

हुलसूर पासून जवळच असलेल्या भाल्की तालुक्यातील जामखंडी येथील रझाकारच्या वेळेस बांधन्यात आलेल्या हा पुल चार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा,तेलंगणा राज्यांना जोडण्याचे एक मेव पुल आहे हा पुल सुमारे पाच ते सहा वर्षांपासून पडलेल्या वेवस्थेत तसाच आहे या पुलापाशी लहान मोठे अपघात नेहमीच होत असतात व अपघातात आतपर्यंत चार जणांचा बळी ही गेलेला आहे याकडे भाल्कीचे आमदार ना बसवकल्याणचे आमदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष घातले नाहीत या पुलाचे कटडे व त्यावरली डांबरी रस्ता ही उखडून मोठ मोठे भगदाड पडले आहेत पडुन चार वर्षे झाली तरी परीयारी वेवस्था म्हणून पुलाच्या शेजारीच कंणगी व दगड गोट्या टाकून केलेला कच्चा रस्ता होता पण कालच्या पावसाने तो ही पुर्णपणे उखडून त्यामधील कंणगी दिसत आहेत त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोठ्या गाड्या रस्ता पाण्यामुळे न दिसल्यामुळे मोठ्या गोड्या आडकुन पडलेले दिसत आहेत सकाळी आडकलेल्या गाड्या काढण्यासाठी जेसीबी च्या साह्याने ओढून काढण्यात आले व दोन्ही बाजूला गाड्याचे रांगच रांगा लागलेल्या दिसत होते या परिसरातील शेतकरी वर्गासाठी शेताकडे जाण्यासाठी ही हा रस्ता पुर्णपणे बंद झाल्याने शेतकरी हा आर्थिक परिस्थिती मध्ये सापडला आहे परिसरातील सोयाबीन व तुर ही ओठ्याच्या बाजूला असलेल्या पुर्णपणे पाण्याखाली गेलेले चित्र दिसत होते लवकरात लवकर या पुलाचे काम सुरू करावे मागणी जामखंडी गावकरी करीत आहेत.

हुलसूर तालुक्यातील देवनाळ येथे रात्री हनुमान मंदिर समोरील चार जणांच्या घरामध्ये पाणी गुडघ्यावर पाणी आल्याने घरातील व्रद्ध महिला व देवनाळ येथे प्रकाश कोटमाळे याची मुलगी सहा महिन्याच्या लेकराला घेऊन बाळातींन उभे राहिल्याचे भयानक परिस्थिती दिसत होती .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button