धारगाव प्रा.आ.केंद्राचा मनमानी कारभार..आदिवासी रुग्णाचीं उपचारासाठी अन्यत्र धावाधाव
नाही वैद्यकिय अधिकारी,नाही सरकारी कर्मचारी,उपचाराविना तिषठतो माझा गरीब आदीवासी..
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- ईगतपुरी तालुक्यातील विविध प्राथमीक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभाराच्या सुरस कथा सातत्याने प्रसिद्द होत असतानांही निर्ढावलेल्या आधिकारी व कर्मचार्यांवर याचा ढिम्म परिणाम होतानां दिसत नाही.असाच आरोग्य यंत्रणेच्या
हलगर्जी कारभाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असुन या यंत्रणेचा कारभार कधी सुधरणार ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.
ईगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील अत्यंत महत्त्वाचे प्राथमीक आरोग्य केंद्र आहे. मात्र सदरचे आरोग्य केंद्र येथील वैदयकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे.
आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख सुविधांवर कोटयावधी रुपयाचां खर्च करीत असतानांही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्षच आहे.
या प्रा.आ.केंद्रात एकही कर्मचारी वा आधिकारी निवासी नसतो. सर्वच जण नाशिक, घोटी आदी शहरातुन ये जा करतात. रात्री तर हे केंद्र चक्क बंदच असते असा आरोप नागरिक करत आहे.
रात्रीच्या वेळी आणीबाणीच्या रुग्णासाठी सदरचे वैदयकीय केंद्र कुचकामी असुन जलद उपचारासाठी पंचवीस ते तीस कि.मी.अंतरावरील घोटी वा खोडाळा ही शहरे गाठावी लागतात.
मग या प्रा.आ.केंद्राचा उपयोग तरी काय ? ही केंद्रे केवळ आधिकारी व कर्मचारी यांनाच पोसण्यासाठी आहे का ? असा गंभीर सवाल करत या केंद्राची सेवा सुधारली नाही तर या केंद्रानां टाळे ठोकले जाईल असा ईशारा येथील नागरिकानीं दिला आहे.
दरम्यान ईगतपुरी तालुक्याचे आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य हे आदिवासीच असतानांही आदिवासी बांधवाचे दैन्य मात्र अजुनही संपत नाही. मग या लोकप्रतिनिधीचां उपयोग तरी काय ? असा सवाल आदिवासी नागरिक करत आहे.
रामभरोसे कारभार थांबवा,,,
धारगाव प्रा.आ.केंद्राचा रामभरोसे कारभार सुरु आहे. दोन वैदयकीय आधिकारी असतानांही निवासी कुणी नसते. कधी कधी केंद्र केवळ शिपायाच्यां भरवशावर टाकले जाते. पारिचारिकेच्या रुग्ण उपचारास मर्यादा आहे.पण कधी कधी या पारिचारीकानांच कामाला जुंपले जाते.
हा रामभरोसे कारभार थांबणार कधी ?
गोविंद पुंजारा
माजी सरपंच धारगाव
उत्तम आरोग्य सेवा पुरवा,
ईगतपुरी तालुका हा आदिवासी अतिदुर्गम बहुल तालुका आहे. शासन येथे उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र आधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करतात.
हा हलगर्जी पणा थांबवा व उत्तम आरोग्य सेवा पुरवा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा माजी जि.प. सदस्य गोरख बोडके यांनी दिला आहे.






