Erandol

?️ Big Breaking…एरंडोल तालुक्यात बोगस डॉक्टर्स शोध मोहीम सुरु…..

एरंडोल तालुक्यात बोगस डॉक्टर्स शोध मोहीम सुरु…..

रजनीकांत पाटील

एरंडोल:- तालुक्यात काही भागांमध्ये अजूनही काही बोगस डॉक्टर्स असून त्यांच्याकडे कोणतीही पदवी नसताना ते खासगी प्रॅक्टिस करत आहेत असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे या बोगस डॉक्टरांकडे येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांना मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत आहे यास प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर बोगस डॉक्टर्स तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक बोगस डॉक्टर्स शोध मोहीम राबवीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जळगाव यांनी आढावा बैठक घेऊन प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत निर्देशीत केले आहे याचाच एक भाग म्हणून एरंडोल तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मान्यताप्राप्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायकांकडे जाऊनच आपल्या आजारांचे उपचार करावे असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार अर्चना खेतमाळीस एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी न जाणे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर न पडणे सामाजिक अंतर पाडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button