वृध्द निराधार महिला व पुरुष यांना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
चळे (ता.पंढरपूर)- येथील वृध्द निराधार महिलांना धा्न्याचे वाटप करताना मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मंडल अधिकारी संतोष सुरवसे साहेब, तलाठी श्री भैरवनाथ गोरे साहेब,शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड ,बालाजी गोवे, महेश पवार आदी.
पंढरपूर,ता.11- महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने चळे (ता.पंढरपूर) येथील निराधार आणि वृध्द महिलांना मनसेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. येथील 60 हून अधिक निराधार महिलांना धान्याचे व मास्कचे वाटप करण्यात आले.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅक डाऊन केल्यामुळे ग्रामीण भागातील शेती व शेतीपुरक व्यवसायाचे चक्र थांबले आहे. याचाच परिणाम शेतात शेतमजुरी करुन आपला उदरनिर्वाह कऱणाऱ्या वृध्द आणि निराधार महिलांच्या दैनंदिन जनजीवनावर झाला आहे. रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. माणूसकीच्या भावनेपोटी मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी शनिवारी (ता.11) चळे (ता.पंढरपूर) येथील 60 वृध्द निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देश आणि राज्यात लाॅक डाऊन करण्यात आला आहे. लाॅकडाऊनचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शेतमजूर, निराधार, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिकांवर झाला आहे. शेतात शेतमजूरी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक वृध्द आणि निराधार महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा महिला आणि पुरुषा पर्यंत अद्याप शासनाची कोणतीही थेट मदत पोचली नाही. त्यामुळे निराधार व वृध्द महिलांचे हाल सुरु आहेत.समाजामधील दुर्लक्षीत असलेल्या अशा निराधार आणि वृध्द महिलांना काही प्रमाणात आधार मिळावा म्हणून मनसेच्या वतीने येथील 60 हून अधिक कुटुंबांना गव्हू,तांदुळ, साखर, चहा पावडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. आज महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने निराधार महिलांना धान्य वाटप करण्यात आले. सुरवातील मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून मंडल अधिकारी श्री. संतोष सुरवसे व तलाठी श्री.भैरवनाथ गोरे यांच्या हस्ते येथील महिलांन धान्याचे वाटप केले.
यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, प्रसिध्दी प्रमुख बालाजी गोवे, उपाध्यक्ष महेश पवार,शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, रवी लोंढे, अक्षय कोळी, बंडू शिंदे, दिगंबर वाघमारे, पृथ्वीराज डुबल,समाधान डुबल आदीं उपस्थित होते.
————-






