Amalner

?️ अमळनेर कट्टा…नियमांचे उल्लंघन करणाऱ्या “ह्या ” मंगल कार्यालय आणि बँड ला 16 हजारांचा दंड…!

?️ अमळनेर कट्टा…नियमांचे उल्लंघन करणाऱ्या “ह्या ” मंगल कार्यालय आणि बँड ला 16 हजारांचा दंड…!

अमळनेर येथे आज सायंकाळी विवाह सोहळ्यात बँड वाजविणाऱ्या जय बजरंग बँड तसेच बन्सी पॅलेस यांना कोव्हिडं 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्या मुळे अनुक्रमे 5000/- आणि 11000/- रु दंड वसूल करण्यात आला आहे. सपोनि राकेशसिंह परदेशी,न प कर्मचारी राधेश्याम अग्रवाल इ नी कार्यवाही केली .

आज बस स्थानक भागात झालेल्या गर्दी ला आळा घालण्यासाठी न प कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रयत्न केला आहे. बस स्थानक भागात सुरू असलेली दुकाने यावेळी बंद करण्यात आली. तसेच शिव भोजन थाळी च्या नावाखाली सुरू असलेले केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. येथे ही न प कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली असे सांगण्यात आले पण किती दंड वसूल केला याबद्दल माहिती मिळाली नाही. याशिवाय सुभाष चौक भागात देखील अनेक भोजनालय,नाश्ता सेंटर सुरू होते या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

जास्तीत जास्त उपहारगृहां मध्ये होणारी गर्दी ही लक्षात घेण्या सारखी असून इतर लोकांना जे नियम लागू करण्यात आले आहेत ते सर्वांना समान लागू करण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याच प्रमाणे लोक प्रतिनिधी मोठया प्रमाणात ढवळा ढवळ करत असल्याची ही चर्चा आज गावात सुरू होती.यात सर्वात जास्त हस्तक्षेप नगरसेवकांचा असल्याची चर्चा होती.तर एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द आमदार साहेबांनीच जाऊ द्या..एक डोळा उघडा ठेवा एक बंद करा असे म्हटल्याची चर्चा आहे..

?️ अमळनेर कट्टा...नियमांचे उल्लंघन करणाऱ्या &Quot;ह्या &Quot; मंगल कार्यालय आणि बँड ला 16 हजारांचा दंड...!

?️ अमळनेर कट्टा...नियमांचे उल्लंघन करणाऱ्या &Quot;ह्या &Quot; मंगल कार्यालय आणि बँड ला 16 हजारांचा दंड...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button