Nashik

लासलगाव जवळील खङकमाळेगाव ला रक्तदान शिबिर संपन्न

लासलगाव जवळील खङकमाळेगाव ला रक्तदान शिबिर संपन्न

नाशिक -जिल्हा प्रतिनिधी-शांताराम दुनबळे

नाशिक -:कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाने देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने कालच मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांनी आवाहन केले त्या पार्श्वभूमीवर आज खडकमाळेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता खडकमाळेगावच्या तरुणाईने सोशल डीस्टन्स व मास्कचा वापर करून आपण आपल्या देशाचे व राज्याचे नागरिक या नात्याने या राष्ट्रीयकार्यात सहभागी होऊन दि .२५ मे २०२० रोजी हरीबाबा मंदिर सभागृह , खडकमाळेगाव येथे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबिरे घेण्यास मोठ्या प्रमाणात अडचनी येत आहेत आणि लोक विविध गैरसमजामुळे घाबरून घरी बसत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे . रुग्णालयांतून रोज होणारी ऑपरेशन्स , स्त्रियांना प्रसूतीदरम्यान आणि कॅन्सर , थैलेसिमिया , डायलिसिस यासारख्या गंभीर आजारांसाठी रुग्णांना रक्त तर लागणारच , मग हा प्रश्न सोडवायचा कसा , या दृष्टीने विचार करून आपण आपल्या खडकमाळेगावांत जनकल्याण रक्तपेढी , नाशिक व खडकमाळेगावकरांच्या संयुक्त ग्रामपंचायत कमिटी विद्यमानाने रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी दत्ता काका रायते , जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास रायते , निवृत्तीबाबा शिंदे , माधवराव रायते , विठ्ठल कान्हे , राजेंद्र शिंदे , डॉ.जाधव , डॉ . गांगुर्डे , हरिष जाधव , पुंडलिक शिंदे , दिपक सोनवणे , प्रसाद शिंदे , राकेश रायते , तानाजी शिंदे , तुकाराम रायते , सागर रायते , किरण शिंदे , गोकुळ शिंदे , काका राजोळे , डॉ.खैरनार , डॉ.बेडके , पुंजाराम रायते , भास्करे रायते , देवराम रायते , अझर मणियार , संतोष रायते , राजेंद्र राजोळे , संतोष रहाणे , संजय काळे , सोपान रायते , शिवप्रसाद लोखंडे व खडकमाळेगाव ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले . कोरोनामुळे जमावबंदी असल्याने रक्तपेढ्यांना शिबिर घेता येत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आवाहन करताच शासकीय नियमांचे अधिन राहुन तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन केले यावेळी वैभव आणि हर्षदा यांचे कालच लग्न झालेले असुनहि ते रक्तदानासाठी आले. दिपाली मोहिते यांनी शिबिरात पहिले रक्तदान करण्यासाठी आल्या , राजेंद्र व रोहिनी नवदांम्पत्यांनी केलेले रक्तदान महिला मुलींना रक्तदानासाठी प्रेरणा देणारे ठरले १८ वर्षात २० रक्तदान शिबिरे आयोजित केली त्यामुळे झालेली जनजागृती व त्यामुळे ऊस्फुर्तपणे महिलांच्या सहभागाने रक्तदान शिबिर आयोजनाचा खुप आनंद झाला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button