Maharashtra

जिल्हा बॅक आसु शाखेचे तपासणीस महादेव पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा चहात्यांकडुन सत्कार

जिल्हा बॅक आसु शाखेचे तपासणीस महादेव पाटील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा चहात्यांकडुन सत्कार

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा तालुक्यातील आसु येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तपासणीस महादेव पाटील यांनी गेली ३० वर्ष विविध शाखेत प्रमाणिकपणे सेवा बजावली आहे ते बुधवार १७ जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पोषाक व मुर्ती देऊन गटसचिव व त्यांच्या चाहत्यांनी सत्कार केला .
परंडा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कार्यालयात बुधवार दि १७ रोजी छोटेखानी कार्यक्रम घेऊन पाटील यांचा सेवानिवृत्त झाल्याने सत्कार करण्यात आला यावेळी गटसचिव जे .आर . गवारे , सोमनाथ भागडे , मधुकर गायकवाड , अमोल शेळके , कल्याण सागर बँकेचे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी , परंडा विकास संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंदे , संचालक मुजीब काझी , राजेश गायकवाड , गोकुळ खैरे , आशोक खैरे , विठ्ठल तिपले , ऑडीटर एस .एस. कुलकर्णी , यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते .
या प्रसगी बोलताना राजेंद्र चौधरी म्हणाले की आसु शाखेचे तपासणीस महादेव पाटील यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या सेवेत त्यांनी बॅकेच्या कोणत्याही खातेदारास त्रास होईल असे काम केले नाही चांगल्या पद्धतीने सेवा केली असल्याचे सांगीतले .
सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त एम .डी .पाटील म्हणाले की माझी ३० वर्षांची सेवा जिल्हा बँकेच्या विविध शाखेत झाली असुन प्रत्येक शाखेत निस्वार्थपणे काम केले असुन सहकार क्षेत्रात काम करताना कांही अडचणी येतात त्यातुन मार्ग काढुन काम केल्याचे पाटील यांनी सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button