अमळनेर प्रतिनिधी
जि. परिषद शाळा गांधली पिळोदे अमळनेर येथे वृक्षारोपण करण्यात आले. अमळनेर पचायत समितीचे शिक्षणविस्तारअधिकारी पी.डी.धनगर साहेब याचे हस्ते झाडे लावण्यात आली. संपूर्ण तालुक्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असल्याने प्रत्येक शाळा महाविद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा गांधली पिळोदे येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भगवान सदांनशिव ,मुख्याध्यापक सुरेखा जयराम पाटील,रमेश पारधी,अशोक मोरे,रवींद्र पाटील,संजय शिंदे,महानंदा सूर्यवंशी,नूतन पाटील,सुनंदा सोनगिरे,संजय महाजन तसेच गावातील ग्रामस्थ पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच झाडांना जाळी लावण्यात आली आहे.








