Amalner

रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत तसेच  रेशनकार्ड नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य मिळावे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन…

रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत तसेच रेशनकार्ड नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य मिळावे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन…

अमळनेर

आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत अमळनेर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजना – महाराष्ट्र,ची कामे सुरु करणे व तालुक्यात स्थलांतरीत,स्थानीक गरजू गरीब रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना,मजुरांना धान्य मिळण बाबत महा.एन.जी.ओ.फेडरेशन,पुणे मार्फत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

कोव्हीड-१९ या जागतीक महामारीमुळे २२ मार्च २०२० पासुन संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा भारत सरकारने केली आहे.या विकट परिस्थितीमध्ये स्थानिक व स्थलांतरीत गरजु,गरीब कुटुंबांना,
मजुरांना रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी भारत सरकारने नियमित बजेटपेक्षा ४० हजार कोटींची जास्तीती तरतुदीची घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केलेली आहे.

यासाठी महाराष्ट्र स्तरावर १५०० सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे संघटन महा एनजीओ फेडरेशन यांनी एकत्र येऊन स्वयंसेवी पध्दतीने स्थानीक, स्थलांतरीत मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळवून देण्याचे जनजागृतीचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
की अमळनेर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची पूर्व पावसाळी व पावसाळी कामे त्वरीत सुरु करावीत यासाठी आपल्या स्तरावरुन पंचायत समिती द्वारे ग्रामपंचायत,वन विभाग,सामाजीक वनीकरण,सार्वजनीक बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग,सिंचन विभाग,लघु पाटबंधारे विभाग यांना आदेश निर्गमीत करावे व त्वरीत मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावेत तसेच या परिस्थितीमध्ये स्थानिक व स्थलांतरीत गरजू गरीब कुटुंबाना ! मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी नागपुर, मुंबई खंडपीठाच्या आदेशानुसार व १९ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार स्थलांतरीत,
स्थानीक गरजू गरीब रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुयांना,मजुरांना त्वरीत धान्य वितरीत करावे.
त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन आपणास निवेदन देत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महा एन जी ओ फेडरेशन,पुणे अंतर्गत
नरेंद्र बाळु पाटील,जिल्हा समन्वयक,महा एन.जी.ओ.फेडरेशन,अध्यक्ष साने गुरुजी फाऊंडेशन,खान्देश विकास प्रतिष्ठान,अमळनेर,
जि.जळगांव,प्रा अशोक पवार,अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर,भारती पाटील,आधार बहुउद्देशीय संस्था,अमळनेर,जि.जळगांव,हिरालाल पाटील,
स्व.महेशभाऊ बहुउद्देशीय संस्था,अमळनेर, जि.जळगांव,सुनिल पाटील,राजरथ फाऊंडेशन,
अमळनेर,कुलदीप कदम,सुहिरा बहुउद्देशीय संस्था,अमळनेर,जि.जळगांव,रविंद्र मोरे,ज्ञाानवर्धिनी फाऊंडेशन,अमळनेर,जि.जळगांव,जयेश काटे
शिवशाही फाऊंडेशन,अमळनेर,जि.जळगांव
जगदीश बोरसे,पेडालाई देवी बहुउद्देशीय संस्था,अमळनेर,संजिव पाटील,मटाई देवी फाऊंडेशन,अमळनेर,चेतन जाधव,ओमसाई शैक्षणिक संस्था,अमळनेर,नितीन नेरकर,

नेहरु युवा मंडळ,गडखांव,ता.अमळनेर,जि.जळगांव,अश्विन पाटील,उडान संस्था,अमळनेर,सतिश पाटील, जयभवानी माता बहुउद्देशिय फाऊंडेशन, कोळपिंप्री,ता.पारोळा,जि.जळगांव,भटेश्वर वाणी कै शंकर यादवशेठ वाणी फाउंडेशन अमळनेर चे प्रतिनिधीं व प्रा जयश्री साळुंखे संस्थापक अध्यक्षआदिवासी एकता संघर्ष समिती यांनी निवेदन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button