Maharashtra

भात पिकांचा विमा हप्ता 31 जुलै पर्यत भराण्याचे अहवान -दिलीप आंबवणे

भात पिकांचा विमा हप्ता 31 जुलै पर्यत भराण्याचे अहवान – दिलीप आंबवणे

पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना बिरसा क्रांती दल यांच्यावतीने सर्व आदिवासी बांधवांना शेतकऱ्यांना नोकरदारांना विनंती करण्यात येते की 31 जुलैपर्यंत पिक विमा हप्ता भरण्याची मुदत आहे तरी बिरसा क्रांती दल तुम्हाला विनंती करते की या गोर गरीब शेतकऱ्याला ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी सहकार्य करा मार्गदर्शन करा तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्या मोबाईल पर्यंत आमचा मँसेज येतो तुमचा मित्र तुमचा भाऊ तुमचा सहकारी म्हणून मी तुम्हाला माहिती पाठवत असतो आणि हि माहिती आपल्या गावातील गोरगरीब जनतेला समजून सांगा हे तुमचं काम आहे.

तुम्ही जर समाजासाठी एवढं केलं तर समाजातल्या गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळेल कारण यावर्षी आपण बघतोय पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे आपण शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा क्रांती दलाला साथ द्यावी आणि बिरसा क्रांती दलाच्या या लढ्यात सहभागी व्हावे तुम्हाला एकच काम आहे की गावातील शेतकऱ्यांच्या विमा काढून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत लोकांना समजून सांगा की चारच दिवस बाकी आहेत आणि ज्याच्या दिवसात ऑनलाइन किंवा तुम्हाला दिलेल्या पेपर कात्रण त्याच्यावर संपर्क नंबर आहे त्यावर संपर्क करून आपण आपला विमा भरावा भात नुसकान मोठ्या प्रमाणात होऊ शकते असं वाटत आहे. असे मत बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी सांगितले.
आंबेगाव जुन्नर खेड मावळ अकोले या भागांमध्ये अजूनही भात लागवड खोळंबले आहेत पावसाने दडी मारल्यामुळे भाताचे रोप जागच्या जागी पडून आहेत शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस नसल्याने शेतामध्ये गाळ काढता येत नाही त्यामुळे झुरा वाहत असलेले पाणी वळवून खासर मध्ये गाळ करण्याचं जुगाड केले जात आहे तर कोणी मोटार लावून पाणी उपसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भात लागवड करताना कसरत करावी लागत आहे पहिलेच शेतकऱ्यांचं हिरड्याने कंबरडे मोडले आहे त्यामध्ये खायचं काय असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button