निजामुद्दीनच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्यांनी आपली माहिती स्वतःहून प्रशासनाला कळवावी
प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
लातूर :- जिल्हाधिकारी जी श्रीकांत
कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी निजामोद्दीन मशीद दिल्ली, पानिपत, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपली माहिती स्वतःहून जिल्हा प्रशासनाला कळवावी. प्रशासनातर्फे आपणास योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कोरोना विषाणूस प्रतिबंध हाच उपाय असल्याने आपण, आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपला गाव हे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेवून सहकार्य करावे. तसेच आपण जमात या कार्यक्रमास सामील झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यास व त्यातून पुढे भविष्यात आपण कोरोना बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणाविरुध्द भारतीय दंड विधान-1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, त्यांच्याकडे वरील विषयी कांही माहिती असेल वर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधून प्रशासनास माहिती देवून सहकार्य करावे. संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. श्री. हिंमत जाधव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, लातूर (भ्रमणध्वनी क्रमांक :- 7020669191), श्री. व्ही.के. ढगे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन लातूर ( भ्रमणध्वनी क्रमांक 91 46 81 59 15), नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय लातूर दूरध्वनी क्रमांक-02382 -220 204.






