दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद – ना.नरहरी झिरवाळआदिवासी जागतिक दिनी १०१ दात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-:क्रातीदिन व जागतिक आदिवासी गौरव दिन निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या दिंडोरी शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे केले.
दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज क्रांती दिन व जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त दिंडोरी पंचायत समिती सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ,कृउबा समिती उपसभापती अनिल देशमुख, दिंडोरी पंचायत समितीचे सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती वनिता अपसूंदे , पंचायत समिती सदस्य ,वसंतराव थेटे, संगीता घिसाडे, विठ्ठलराव अपसुंदे, शंकर चारोस्कर,शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर के खैरनार, दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम नामदार झिरवाळ यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा व महात्मा गांधी यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावरून बोलताना आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की दिंडोरी शिक्षक संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोविड सारख्या संकट काळात महत्त्वाचे सामाजिक कार्य शिक्षक संघाने केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दिंडोरी पंचायत समितीचे सभापती कामिनी चारोस्कर राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे , जिल्हाध्यक्ष आर के खैरनार ,मराठी पत्रकार संघाचे संतोष कथार यांनी ही कार्यक्रमाला शुभेच्छा देत शिक्षक संघाचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शिक्षक संघटनेच्या कार्याचा गौरव केला. यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले.
व्यासपीठावर शिक्षक संघाचे राज्य सदस्य मिलींद गांगुर्डे, एनडीपीटी चे माजी चेअरमन दीपक सोनवणे, माजी व्हा चेअरमन सोमनाथ पवार, संचालक उमेश बैरागी, शरद बरमे, नाशिक तालुका अध्यक्ष प्रदीप पेखळे आदी उपस्थित होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष कथार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू चव्हाण ,पत्रकार अशोक निकम ,संदीप गुंजाळ ,बाळासाहेब अस्वले आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात १०१ शिक्षकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.रक्त संकलन साठी अर्पण रक्तपेढीच्या श्रीम किरण जाधव, डॉ अनिल धनवट आदीसह टीमने परिश्रम घेतले. त्याच प्रमाणे कोरोनाची ड्युटी केलेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते समाज रक्षक प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन तालुका नेते धनंजय वानले यांनी केले तर आभार सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय सरचिटणीस प्रमोद शिरसाट, नंदकुमार गांगुर्डे, प्रदीप मोरे, दत्तात्रय चौगुले, श्रावण भोये, नरेंद्र आहेर, नियाज शेख, मधुकर आहेर बाळासाहेब बर्डे ,कैलास पाटोळे,
कल्याण कुडके, प्रवीण वराडे, शरद डगळे, विलास पेलमहाले, किरण शिंदे, सचिन वसमतकर, सचिन भामरे,सतीश बर्डे, दीपक खैरनार, भाऊसाहेब बिरारी, बलराम माचरेकर, किशोर गायकवाड, गुलाब दातीर, मनोहर कोतवाल, सोमनाथ उचाळे, भूषण बोरस्ते,सुभाष महाले, हिरामण भोये, माधव डांगे ,प्रदीप सावंत, गणेश बोरसे ,लालजी बागुल, मनोहर गांगुर्डे, ज्ञानेश्वर वायाळ, राकेश पाटील,सुनील कराड, कचरू लिलके, जयदीप गायकवाड, मिनाज पठाण, हेमंत खैरनार, प्रदीप मोरे, ज्ञानेश्वर कोकणे, दिलीप शिंदे, विजय बोरसे, राहुल गटकळ, महेश शिरोडे ,सुरेश मोरे, बाळू जाधव, चेतन घरटे, संतोष झनकर, बाळू जाधव , वसंत येळवे, राकेश थेटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.






