Maharashtra

स्वराज्य स्वामी विवेकानंद “वैद्यकीय सेवा जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

स्वराज्य स्वामी विवेकानंद “वैद्यकीय सेवा जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

संस्थेचे अध्यक्ष प्रा. तूकाराम पाटील यांची माहीती

कोल्हापूरःआनिल पाटील

स्वामी विवेकानंद समाज विकास सेवा संस्था व स्वराज शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या सयुक्त विद्यमाने वैद्यकीय क्षेञात उत्कुष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वराज्य स्वामी विवेकानंद वैद्यकीय जीवन गौरव सेवा पुरस्कार या वर्षी डॉक्टर दिनानिमित्य जाहीर करण्यात येत आहे. अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातुन डोंगराळ, दुर्गमवाडी वस्तीतील, अदिवाशी या ठिकाणी ५० हुन अधिक आरोग्य शिबीरे ,मोफत औषध पुरवठा तसेच महिलांच्या आरोग्यासाठी २५ हुन अधिक आरोग्य शिबीरे व समुउपदेशन त्याचबरोबर विविध कर्मचारी वर्गासाठी १५ आरोग्य शिबीरे व मोफत रक्त तपासणी आणि २०१९ च्या महापुरावेळी संपुर्ण जिल्हात पुरग्रतांच्यासाठी ४० हुन अधिक आरोग्य शिबीरे, मोफत औषध पुरवठा व साथ रोग नियंञनासाठी जनजागृती अभियान त्याचबरोबर आत्ताच्या कोवीड १९ च्या जागतिक आपत्तीमध्ये धनगरवाडे, गरजू व गरीब घटक ,ग्रामपंचायती ,पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी ४० शिबिराच्या माध्यमातुन एक लाख अल्सेनिक अल्बम ३० च्या होमोपेथिक औषध गोळ्यांच्या डबींचे वितरण व कोव्हीड १९ च्या माहिती पत्रकांचे जन जागृती अभियान उपक्रमाद्वारे ५० हजार माहिती पत्रकांचे वाटप तसेच २० हजार मास्कचे वितरण असे गेली १०वर्षात ३०० हुन अधिक वैद्यकीय उपक्रम राबिवणाऱ्या देवदूत डॉ.दिपा गुरुनाथ कुष्ठे, डॉ नंदिनी विजय गावडे (कदम), डॉ.अश्वीनी अर्जुन खोराटे, डॉ.माधुरी राजेंद्र खोत या वैद्यकीय अधिकारी यांना डॉक्टर दिनानिमित्य स्वराज स्वामी विवेकानंद वैद्यकीय सेवा जीवन गौरव पुरस्कार २०२० ने गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती सस्थेचे अध्यक्ष प्रा.तुकाराम पाटील यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button