Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात ऑनलाइन अध्ययन-अध्यापनास सुरुवात

धनाजी नाना महाविद्यालयात ऑनलाइन अध्ययन-अध्यापनास सुरुवात

सलीम पिंजारी

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या परिपत्रकानुसार दिनांक 1 ऑगस्ट पासून ऑनलाइन अध्ययन-अध्यापनास नियमितपणे सुरुवात झाली.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी ऑनलाइन अध्ययन-अध्यापन समिती गठित केली. या समितीचे समन्वयक उपप्राचार्य तथा आय क्यू ए सी समन्वयक डॉ उदय जगताप यांच्यासोबत महाविद्यालयातील अनुभवी तसेच तांत्रिक दृष्ट्या कुशल अशा प्राध्यापकांची टीम तयार करून शैक्षणिक वेळापत्रक वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ डी ए कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले. यासोबत वेळोवेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत ऑनलाइन मीटिंग आयोजित करून सुसंवाद साधला. टाइम टेबल नुसार ऑनलाईन अध्ययन-अध्यापनात सर्वच प्राध्यापकांनी अत्यंत उत्साहीरित्या तयारी दर्शवत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले. सुरुवातीला आलेल्या तांत्रिक अडचणी समिती सदस्यां मार्फत सोडवून घेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून ऑनलाइन अध्ययन अध्यापनाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.

याचसोबत धनाजी नाना महाविद्यालयात कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखेतील पदवी व पदव्युत्तर विविध विषयांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वी पणे राबिवली. यासोबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या बी सी ए, एम सी ए, एम बी ए या अभ्यासक्रमांना ही प्रवेश दिला जात आहे. यासोबत सैन्यभरती, पोलीस भरती व एनडीए’च्या विशेष तयारीसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा पालकाला महाविद्यालयात व्यक्तिशः येण्याची ची गरज भासली नाही. अत्यंत सुटसुटीत आणि सोप्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. या उपक्रमाचे कौतुक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परिक्षेत्रात होत असून या यशस्वी उपक्रमाचे सारे श्रेय प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांना जाते असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी व्यक्त केले. यासोबत तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा के आर चौधरी, सचिव प्रा एम टी फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंद वाघूळदे व नियामक मंडळ सदस्य यांनीही ही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करून महाविद्यालयाची ची घोडदौड यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. महाविद्यालया च्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button