Maharashtra

राजगृह तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन

राजगृह तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह – प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटने संदर्भात महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे साहेब व विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया यांना सदर घटनेतील आरोपीचा शोध घेऊन कठोरात कठोर कार्यवाही बाबत मागणीचे निवेदन ई-मेल द्वारे केली.

सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन कठोरात कठोर कार्यवाही करावी.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी एक महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही. त्यामुळे या घटनेचा आम्ही श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो व सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी ही नम्र विनंती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button