दूषित पाणी पुरवठयाने आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी तापाने हपापले,
नागपूर प्रतिनिधी मुकेश नैताम
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह,पारडी, कळमना (J-बिल्डिंग),नागपूर. एकाच वेळी 60 पेक्षा जास्त विद्यार्थी आजारी पडले आहे.
मंगळवारला विद्यार्थ्यांना गृहपालांस आजारी विद्यार्थाना रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले तेव्हा त्यांच्याकडून गैर जबाबदारीचे उत्तरे मिळाल्यामुळे विद्यार्थी संताप झाले त्यांनी आरोग्याची समस्या दूर होईपर्यंत वसतीगृहाच्या परिसरात ठिय्या देण्याचा निर्णय घेतल्याने गृहपाल हटावची मागणीसह इतर मागण्यासुद्धा विद्यार्थानी रेटून धरल्या होत्या प्रकरण वाढत असे प्रकल्प अधिकारी यांना लक्षात येत्याच दुसऱ्या दिवसी तातडीने वसतीगृह गाढ़ले व आजारी मुलांचा आढावा घेतला सोबतच गैर जिमैदार गृहपाल श्री.गेडाम यांची बदली करण्याचे आदेश दिले.
सदर प्रकार इतरत्र व असुविधाचा बोझवारा कमी व्ह्यव विद्यार्थाशी पालकत्वाचे नाते जुळावे या उदात्त हेतूने प्रशासनाने गृहपाल हे पद निवासी असावे अस शासन निर्णयात नमूद असतांना सुद्धा व आदेश मा.आदिवासी विकास मंत्री यांचे शक्त आदेश असतांना सुद्धा गृहपाल वसतीगृह मुख्यालयी राहत नसल्याने वरील प्रकार होतात व सदर आदेश पाळत नसल्याने यांची तक्रार विभागाच्या प्रधान सचिवासह आदिवासी विकास मंत्री यांच्याकड़े लेखी तक्रार केली जाईल असे प्रकल्प अधिकारी श्री.डिंगाबर चव्हाण यांच्या समक्ष चर्चेअंती निवाळा न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघ निवेदनाद्वारे सदर तक्रार करणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष मुकेश नैताम यांनी एका प्रसिद्धिपत्रका द्वारे कळवले आहे.









