Amalner

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा युवक कार्यकर्त्यांचे निवेदन.

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा युवक कार्यकर्त्यांचे निवेदन

नूरखान

अमळनेर शहरातील व तालुक्यातील कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन झालेल्या काळात मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील युवा कार्यकर्त्यांनी तहसीलदार मिलींद वाघ यांना निवेदन दिले.

देशात कोरोना या विषाणूने देशावर मोठे संकट आले आहे. घातले आहे त्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन झाले त्याचा फटका घेतला त्यामुळे नोकऱ्या गेल्या बेरोजगारी चे संकट ओढवले त्यात मंदी आली सर्व उद्योगधंदे बंद पडलीत.
अत्यावश्यक सेवेत फक्त किराणा बाजीपाला,दुध,दवाखाने मेडिकल्स् वगळता संपुर्ण व्यवहार बंद झाले त्यामुळे काम मिळेनासे झाले यामध्ये सलुन ब्यूटी पार्लर व ऑटो रिक्षा, खाजगी वाहने, वाजंत्री, सराफ ज्वेलरी, हॉटेल किरकोळ विक्रेते किरकोड खाद्य विक्रेते उध्वस्त झाले यातून सावरायला वेळ लागेल मात्र हाती पैसा नाही लॉकडाऊनचा फटका शेतकरी,शेतमजुर व्यापारी यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर बसला शेतकऱ्यांनी माल जसा वेळ मिळेल तसा विकला. त्यासाठी शहरातील नागरिक व शेतकरी कामगार वर्ग यांना सरकारने दिलासा द्यावा व या काळातील सर्व
नागरिकांचे विज बिल 100 यूनिट पर्यंत माफ करा अशी मागणी तहसीलदार वाघ यांच्याकडे केली. सदर निवेदनात असे म्हटले आहे की अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनो चे भयंकर संकट आहे त्या परिस्थिती मध्ये फटका बसलेल्या शहरातील सर्व व्यावसायिकांना बसला असुन त्यामूळे शासनाने लोकांचा हिताचा विचार करुन निर्णय घ्यावा अशी केली आहे. निवेदन देतना गोविंदा बावीस्कर,भुषण भदाने,सुनिल शिंपी,सनी गायकवाड,गणेश पाटिल यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button