AhamdanagarMaharashtra

?️ तमाशा फड मालकाला सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा शेतकऱ्या प्रमाणे आत्महत्या करू- तमाशा प्रमुख स्वाती अंजना शेवगावकर

?️ तमाशा फड मालकाला सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा शेतकऱ्या प्रमाणे आत्महत्या करू- तमाशा प्रमुख स्वाती अंजना शेवगावकरसुनील नजनअहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या यात्रा यावर्षी आलेल्या साथीच्या आजारामुळे बंद करण्यात आलेल्या आहेत.तमाशाच्या कलेवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे कलाकार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे तमाशा फड मालकावर उपासमारीची वेळ आलेली आहे.सरकारने शेतकऱ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना अनुदान दिले पाहिजे नाहीतर शेतकऱ्याप्रमाणे तमाशा फडमालक आत्महत्या करून तमाशा कला संपवून टाकतील अशी जळजळीत प्रतिक्रिया शेवगाव येथील सुप्रसिद्ध तमाशा फडमालकिन स्वाती अंजना शेवगावकर यांनी दिली.

त्यांच्या समवेत शब्बीर भाई शेख यांनी ही आपल्या मनात असलेली खदखद व्यक्त केली. तमाशा कलावंतांना कोणीच वाली राहिला नसल्याने सरकारने तमाशाच्या फडमालकाला अनुदान दिले पाहिजे अंन्यथा ही कला संपुष्टात येईल. फडमालकावर असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तमाशा मालक आहेत. अखेरची घरघर लागल्याने तमाशात काम करणाऱ्या कलावंतांना कसे जगवावे व तमाशा फडावर घेतलेले कर्ज कसे परतफेड करावे ही खंत तमाशा फडमालक व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button