Chalisgaon

सावधान….सावधान..वाळू माफिया सक्रिय

सावधान….सावधान..वाळू माफिया सक्रिय

मनोज भोसले

तालुक्यात वाळू माफिया पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत. अवैध वाळू तस्करीत बदनामी झाल्याने यांनी नवा मार्ग काढला आहे. हा सर्व प्रकार कायदेशीर करण्याची मोठी चाल उघडकीस आली आहे. गिरणा नदी काठच्या एका गावातील सरपंच आणि तीन चार सदस्यांना हाताशी धरून वाळू ठेक्याचा ठराव केला आहे. संपूर्ण गाव अंधारात ठेऊन या सरपंचाने ठरावाची कॉपी तयार केली. गुपचूप येऊन ती कॉपी तहसीलदार आणि विभागीय अधिकारी यांना सादर केली*सावधान....सावधान..वाळू माफिया सक्रियया ठरावा विषयी गावकर्यांना काहीही महित नव्हते आज हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला आहे. *या ठरावपोटी वाळूमाफिया कडून सरपंचाने 5 कोटी रुपये घेतल्याचं स्पस्ट झालं आहे*
*ग्रामसभेला अंधारात ठेवून गावाच्या विकासाला मारक असा ठराव स्वतःच्या आर्थिक हितासाठी घेतला आहे. हे पाहता हा ठराव बेकायदा ठरतो. या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन वाळू ठेका रद्द करावा हा नवीन ठराव तयार केलाय. तो ठराव न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे*.
चाळीसगाव तालुक्यातील गिरणा आणि तितुर नदी काठच्या गावकर्यांना विनंती आहे की आपल्या गावात वाळूमाफिया यांनी ग्रामसभेला अंधारात ठेवून काही ठराव केले आहेत का? या ठरावपोटी काही मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली का याची तपासणी करा.
याच वाळूच्या पैशातून बऱ्याच निवडणूका झाल्यात. कुणाला फायदा झाला? पैसे कोण काढणार ? कुणाची घराचे बंगले होणार? हे सर्वज्ञात आहे. पण तुमची आमची गावं ओसाड आणि पोर उघडी पडताय. हे लक्षात घ्या….
आपल्या गावात असे गुपचूप अंधारात काही ठराव झालेत का तपासा. नाहीतर ज्या प्रमाणे जळगाव तालुक्यातील गिरणा नदी विवस्त्र केली. वाळू ने ओसाड वाळवंट केलं तस आपला गिरणा काठ होऊ नये याची आपण काळजी घ्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button