Mumbai

जनसेवा समिती, विलेपारले आणि एल जे एन जे महिला महाविद्यालय याचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ श्री रायगड छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन

विले पार्ले मुंबई प्रतिनिधी
जनसेवा समिती, विलेपारले आणि एल जे एन जे महिला महाविद्यालय याचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि ३१ ऑगस्ट २०१९ या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत महाविद्यालयाच्या सभागृहात शिवतीर्थ श्री रायगड छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

जनसेवा समिती, विलेपारले आणि एल जे एन जे महिला महाविद्यालय याचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ श्री रायगड छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन
रायगडाच्या भौगोलीक, ऐतिहासिक, नैसर्गिक पैलू आणि गडावरील वास्तू व अवशेष यांचे यथार्थ दर्शन घडणवणारी १४० छायाचित्रे व ३५ माहिती तक्ते यांचा सामावेश असलेल्या या सुंदर प्रदर्शनीचा महिला संघाच्या महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थीनी व माधवराव भागवत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी असे एकूण 400 जणांनी रायगडाचे मनोहारी दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या भोसले मॅडम यांनी ठीक १० वा प्रदर्शनीचे औपचारिक उदघाटन केले.
छायाचित्र प्रदर्शनासोबतच रायगडाचे नयनरम्य व अद्भुत दर्शन देणारी एक चित्रफीत मुलांना दाखवण्यात आली.
एल जे एन जे महिला महाविद्यालय, इतिहास विभागाच्या प्रमुख *सौ रोमिला गायकवाड मॅडम* तसेच *श्री गायकवाड सर* यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन सम्पन्न झाले.
संस्थेचे शिरीष फाटक, आशिष बापट, बेला बर्वे, जान्हवी दातार, अंबरीश पवार, सौ शिरवाईकर, श्री प्रदीप पाटील आणि सानिका उधोजी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला.
एक अतिशय देखणे प्रदर्शन आणि रायगडासारखा स्फूर्तीदायी विषय यांची पार्श्वभूमी लाभलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button