Mumbai

?️ Breaking  Drugs Case मध्ये बॉलीवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केले कोकेन

?️ Breaking Drugs Case मध्ये बॉलीवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केले कोकेन

मुंबई : बॉलिवूडवरचं ड्रग प्रकरणाचं सावट दूर होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ड्रग प्रकरणात कारवाई सुरू आहे. गुरुवारी देखील या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट सुरज गोडांबे याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. एनसीबीने सुरजकडून काही प्रमाणात कोकेनही जप्त केलं आहे. तो एका प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसमध्ये मेकअप डिपार्टमेंटचा मुख्य आहे. एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग प्रकरणात छापेमारी करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शननंतर बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अनेकांना एनसीबीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.

या प्रकरणात अनेक बडे मासे देखील एनसीबीच्या गळाला लागले आहेत.

सुरजने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे मिळालेल्या कोकेनचा आणि त्याने ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या बॉलिवूड कलाकारांचा काही संंबंध आहे का, याचा तपास NCB कडून केला जाईल अशी शक्यता आहे. यामध्ये आता आणखी कोणती मोठी नावं पुढे येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मंगळवारी देखील एनसीबीने ड्रग प्रकरणात एकाला अटक केली होती. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणाऱ्या अनुज केशवानी ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आली होती. एनसीबीने ड्रग पेडरर रिगल महाकालाला अटक केली होती. रिगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंधेरी पश्चिम भागात एनसीबीकडून छापेमारी केली जात आहे. उच्च प्रतीची मलाना क्रिम आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button