फैजपूर शहरात गुरांवरील लंपी स्किन रोगावर प्रतिबंधित लसी उपलब्ध करणार
अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत निर्णय
–
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दुधउत्पादकानां संस्थेने म्हैशीच्या दुधावर प्रतिलिटर चार रुपये,गाईच्या दुधावर प्रतिलिटर तीन रुपये भावफरक व या सर्व दुधावर प्रतिलिटरवर साठ पैसे बोनस तसेच १३ टक्के डिव्हिडंड,मिटिंग भत्ता शंभर रुपये व दुधाच्या प्रमाणात बक्षीस देण्याचे संस्थेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले.
फैजपूर येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेची २०२१-२०२२ या वर्षांच्या ४५ वी सर्वसाधारण सभेचे आयोजन दि ७ ऑगस्ट रोजी संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होते.यावेळी विषय पत्रिकेवर १७ विषय घेण्यात आले होते.या सर्व विषयांवर चर्चा होऊन सभेत सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.संस्थेचे कार्य चांगले असल्याने प्रगतीपथावर आहे.दूध ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी या दूध उत्पादक संस्थेची सभासद संख्या ३८६ इतकी आहे.तर भागभांडवल ४लाख ९७ हजार ८०० व बक्षिस वितरण सोडून ६ लाख ५९ हजार ४२५ इतका नफा असून तसेच गाय व म्हैस,भावफरक१६,१५,९०१, बक्षीस ४,३५, २००,बोनस २,३६७८६,डिव्हिडंट ६४,७१४ अशी वितरणची संस्थेतर्फे तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान दूध उत्पादकांकडून म्हैस व गाय असे प्रति दिन एकूण १६०० लिटर दुध पुरवठा होतो. तर संस्थेकडून सभासदांच्या गुरांना मोफत लसीकरण दिले जाते.विशेष म्हणजे या संस्थेने फैजपुर शहराची वाढती व विस्तारामुळे अस्तित्वात आलेल्या नविन रहावाशी वस्त्यांसह शहराचा सेवाभावी विचार करून शहरात सर्वप्रथम स्वर्ग रथ व शवपेटी उपलब्ध केली त्यामुळे विशेष करून कोरोना काळात या संस्थेला समाजसेवेची संधी मिळाली. दरम्यान दूध उत्पादक यांच्या कडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे या संस्थेकडून दूध उत्पादकांचे हित साधले जाते.दि ७ ऑगस्ट रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नफ्याच्या रकमेतून संस्था दूध उत्पादकांना बक्षिस वितरित केले.ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेचे प्रास्ताविक चेअरमन हेमराज चौधरी यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ संचालक भास्करराव चौधरी यांनी मानले.दरम्यान २०२१-२०२२ या वर्षात मैस व गाय चा जास्त दूध पुरवठा करणारे पहिले दहा सभासदांचा यासभेत सत्कार करण्यात आला. विषेश करून पाळीव प्राणी गाय,म्हैस, बैल या गुरांवर लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. म्हणून फैजपूर शहरातील सर्व गुरे निरोगी राहतील यासाठी अंबिका दूध संस्था निधी उपलब्ध करून स्वखर्चाने प्रतिबंधित लसी उपलब्ध करून यावल तालुका पशुसंवर्धन अधिकारी संतोष बढे व फैजपूर पशुवैद्यकीय रुग्णालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नितीन इंगळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून शहरात गुरांना लसीकरणाचा उपक्रम राबविणार आहे.यावेळीव्यासपीठावर चेअरमन हेमराज चौधरी,व्हा चेअरमन नितीन राणे,जेष्ठ संचालक भास्करराव चौधरी, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे,डिंगबर कोल्हे,मोहन वायकोळे, रमेश झोपे,जितेंद्र भारंबे,अजय महाजन,लक्ष्मण झांबरे,उमाकांत भारंबे,विनोद चौधरी,अप्पा चौधरी,विजय पाटील,वंदना कमलाकर कोल्हे,ज्योतसना मोतीराम भारंबे,सेक्रेटरी सुनील क्षत्रिय, सभेला दुधउत्पादक उपस्थित होते.यशस्वी तेसाठी लिपिक कांचन अनिल राणे,सौ कल्पना विलास कोल्हे,विकास भारंबे,मंगु तडवी यांनी परिश्रम घेतले.






