India

Amazing: कोंबडी आधी की अंडे आधी..? प्रश्नाला कंटाळात ना..मग हे त्याच उत्तर.. अखेर शोध लागला…

Amazing: कोंबडी आधी की अंडे आधी..? प्रश्नाला कंटाळात ना..मग हे त्याच उत्तर.. अखेर शोध लागला…

कोंबडी आधी जन्माला आली का अंड? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात पडतो. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हा प्रश्न आपण एकमेकांना विचारला असेल. पण याचे समाधानकारक उत्तर आज पर्यंत तरी आपल्याला देता आले नाही. परंतु या यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास वैज्ञानिकांना मात्र यश आले आहे. या प्रश्नाचे उत्तर द्यायचा आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केला. जर कोणी कोंबडी आधी म्हटले, तर त्याला लगेच प्रतिप्रश्न केला जायचा ‘कोंबडी कशातून जन्माला आली?’ याचे उत्तर अंड्यातून असे असायचे!! तर मंग कोंबडी आधी कशी? आणि जर अंडे आधी म्हटले तर अंडे कशातून जन्माला आले? याचे उत्तर कोंबडी असे असायचे. त्यामुळे अंडी आधी का कोंबडी याचे उत्तर आपल्याला मिळत नसायचे.

मात्र, वैज्ञानिकांनी या गहन प्रश्नाचे उत्तर ‘कोंबडीच आधी जन्माला आली !!” असे दिले आहे. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले आहे की,”कोंबडीच आधी जन्माला आली आहे. उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये पक्षांमध्ये झालेल्या जनुकीय अपघातातून कोंबडी प्रथम जन्माला आली. अंड्याच्या कावचासाठी लागणारे प्रथिने फक्त कोंबडीच निर्माण करू शकते.” विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या ‘सायंटिफिक फॅक्ट’ नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळाने या उत्तराची पुष्टी केली आहे.

उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये जनुकीय बादलातून अनेक सजीव जन्माला आले. त्यांच्या भोवतालच्या पर्यावरणीय गरजांनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतले. ज्यांनी हे बदल केले नाही असे डायनोसॉर, आपले पूर्वज असलेल्या काही माकडाच्या प्रजाती आणि इतर सजीव कालांतराने नष्ट झाले. सुरवातीच्या कालखंडामध्ये प्रथम कोंबडी जन्माला आली आणि नंतर तिने अंड्यातून प्रजोत्पत्ती करायला सुरुवात केली. त्यामुळे कोंबडीच आधी!!: या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजतायगत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर सापडलेय.
ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हे उत्तर समोर आलेय. त्यांनी केलेल्या अभ्यासातून पहिली कोंबडी आली होती हे उत्तर समोर आलेय.

शेफील्ड आणि वारविक युनिर्व्हसिटीच्या शास्त्रज्ञांनी हे उत्तर शोधून काढलंय. रिसर्ट रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांच्या शोधात असे आढळलेय की कोंबडीचा जन्म आधी झालाय. ओवोक्लोइडिन नावाच्या प्रोटीनमुळे अंड्याचे कवच तयार होते. या प्रोटीनशिवाय अंड्याचे कवच तयार होऊ शकत नाही.
संशोधकांचे याबाबत काय म्हणने आहे?

अंडी तयार होण्याकरीता ओव्होक्लाडीन म्हणजेच ओसी 17 नावाचे प्रोटीन फार महत्वाचे असते. आणि गर्भवती असताना कोंबडीच्या गर्भात हे विशिष्ट प्रकारचे प्रोटीन निर्माण होत असते.यावरून सिदध होते की जगात पहिले कोंबडी आली होती मग अंडे आले होते.

संशोधकांनी याचा शोध कसा लावला?

जगात पहिले कोंबडी आली होती की अंडे याचा शोध लावण्यासाठी संशोधक वर्गाने हायटेक कंप्युटरचा हेक्टर याचा उपयोग केला होता.
ज्याने संशोधकांना अंडयाच्या कवचाची आण्विक रचना कशा पदधतीचे आहे हे समजुन आले.

  • संशोधनात असे देखील समोर आले की ओसी 17 ह्या प्रोटीनच्या साहाय्याने अंडयाच्या शेलमध्ये कँल्शिअम कार्बोनेटचे कनव्हरझन होणे सुरू होते.मग कालांतराने हळुहळु हेच घट्ट होते आणि त्यात आपल्याला कँल्साईट क्रिसटल्स सापडत असतात.
  • संशोधक काँलिन फ्रिमन याबाबद असे म्हणतात की कोंबडीचे हाड आणि अंडयाचे कवच यात कँल्साईट क्रिस्टल आढळुन येत असतात.

आणि ज्या वेळेस हे अंड पुर्णपणे तयार होत असते.त्यानंतर ते बाहेर येत असते.
अशा पदधतीने जगात कोंबडी आधी आली होती की अंडे ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळाल आहे फक्त जगामध्ये कोंबडीचा विकास कशा पदधतीने झाला याचे उत्तर अद्याप शास्त्रज्ञांना देखील प्राप्त झालेले नाही.जगभरातील संशोधक ह्या प्रश्नाचे उत्तर अजुनही शोधत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button