Mumbai

उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळांसाठी ह्या आहेत शासनाच्या मार्गदर्शक सूचना

उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळांसाठी ह्या आहेत शासनाच्या मार्गदर्शक सूचना

राज्यातील पहिलीपासूनचे पुढील सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्य सरकारने त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करीत सोमवारी नवे आदेश काढले.

त्यानुसार मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत.

  • शिक्षकांनी शक्‍यतो त्याच गावात राहावे
  • लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत
  • मुलांनी मास्कचा वापर करावा
  • विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दोन सत्रात शाळा भरावावी
  • एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत
  • दोन बाकातील अंतर सहा फूट असावे
  • एका बाकावर एकच विद्यार्थी असावा

अशा विविध सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होत असल्याने मुलांची संख्या लक्षणीय राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी त्या- त्या मुख्याध्यापकांवर असेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button