Maharashtra

कौटुंबिक वादातून तरूणाची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

कौटुंबिक वादातून तरूणाची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी । सततच्या कौटुंबिक वादातून ३७ वर्षीय तरूणाने बांभोरी नदी पात्रातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष फकिरा आंभोरे (वय-३७) रा. पिंप्राळा हुडको ह.मु. बांभोरी ता. धरणगाव हा तरूण वाळूच्या ठेक्यावर हातमजूरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या आठवड्यापासून घरघुती वादातून पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी खेडी कढोली येथे माहेरी निघून गेल्या होत्या. बांभोरी नदी पात्रातील पाळधी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या केली. विहीरीत तरूणाने उडी घेतल्याचे बांभोरी गावातील काही ग्रामस्थांनी पाहिले होते. पोहण्यासाठी त्याने उडी घेतली असावी असा समज झाला. मात्र काही मिनीटानंतर तो वर आला नसल्याची शंका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी विहीरीजवळ धाव घेतली. अर्ध्यातासानंतर काही पोहणाऱ्यांनी त्याचा मृतदेहच बाहेर काढला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाख्पल केले असता वैदयकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परीवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button