पिंपळीच्या “प्रेरणा महाजन ” ची उत्तुंग भरारी – छोट्याश्या गावात शिकुन मिळवले 90% गुण
अमळनेर प्रतिनिधी- रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील पिंपळी या छोट्याश्या गावातील ग्राम विकास मंडळ संचलीत महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनीं प्रेरणा पांडूरंग महाजन हिने एस.एस.सी.मार्च 2020 परिक्षेत 90.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.
घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतांना,कोणतीही खाजगी शिकवणी क्लास न लावता,शेतकरी कुटुंबातील प्रेरणा महाजन हिने आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवले.
प्रेरणा महाजन हिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रेमराज वामनराव चव्हाण,चेअरमन जनार्दन मांगो शेलकर,सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक जिजाबराव पवार, अमळनेर माळी समाजाचे अध्यक्ष गंगाराम निंबा महाजन,समाजसेवक चुनिलाल जयराम महाजन,कौतिक उखा शेलकर, महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य विकास महाजन,अमळनेर ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष मकसुदभाई बोहरी,ग्राहक पंचायतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी यानी अभिनंदन केलेले आहे.
” प्रेरणा महाजन “ची प्रेरणा गाव खेड्यातील विद्यार्थिनींनी घ्यावी असे महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी फोनवरुन दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलेले आहे.






