Amalner

Amalner: विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार…

Amalner: विलासराव पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी- धुळे येथील महानगरपालिकेचे मुख्याध्यापक तथा देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन तथा संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांच्या नुकताच सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.
विलासराव पाटील यांनी निवड मंडळाच्या माध्यमातून आपल्या नोकरीला सुरुवात करून धुळे महानगरपालिका शाळेत अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आदर्श नागरिक बनवले. आपली सेवा त्यांनी इमाने इतबारे केली व शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले ते नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवापुर्ती सहकुटुंब सत्कार देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन शिक्षक ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी यांनी शाल बुके ड्रेस व साडी देऊन उत्साहपूर्ण वातावरणात केला.
सत्काराला उत्तर देताना विलासराव पाटील म्हणाले की आपण माझ्याकडे येऊन हितगुज केली हाय माझा सन्मान आहे आपण शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता अशीच भविष्यातही टिकवावी असे सांगत संस्थेच्या सचिव श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील म्हणाल्या की महात्मा फुलेंच्या शाळेत माळी समाजातील शिक्षकांची नेमणूक केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण शाळेची गुणवत्ता वाढवत आहात याचा आम्हाला सर्वस्वी आनंद आहे असेच कार्य करत रहा असे सांगितले.
यावेळी विलासराव पाटील सरांची मुलगी विशाखा विलासराव पाटील हि फॅशन डिझायनर पदवी संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button