Jalgaon

विटनेर येथील तरुण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या

विटनेर येथील तरुण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या

रजनीकांत पाटील

जळगाव >> तालुक्यातील विटनेर येथे कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली.
मनोज धनराज परदेशी (४०) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोज यांच्याकडे साडे चार एकर शेती असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, बँक व इतर असे एकूण तीन लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे.
शेतातून दरवर्षी दरवर्षी फारसे उत्पादन येत नाही. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो.

दुसरीकडे कर्ज व त्यावरील व्याजाचा डोंगर वाढतच जात असल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती करणे अवघड झाले होते.
कर्ज फेडण्याच्या चिंतेत कुटुंबात बऱ्याच वेळा वादविवादही होत होते.
मंगळवारी मनोज हे शेतात गेले असता दोन वाजता त्यांनी विष घेतल्याचे पत्नीच्या लक्षात आले.

त्यांनी मुलगा व इतर लोकांच्या मदतीने तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
मनोज परदेशी यांच्या पश्चात पत्नी शिल्पा, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button