sawada

शाळेत साखरच्या प्लास्टिक  गोन्यात शा पो आहाराचे तांदूळ ! म्हणजे मोठा घोळ.

शाळेत साखरच्या प्लास्टिक गोन्यात शा पो आहाराचे तांदूळ !

म्हणजे मोठा घोळ.

अधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भूमिका सोडावी

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सविस्तर वृत्त असे कि जवळपास दिड महिना पुर्वी पासून सतत गाजत असलेला अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेतुन विद्यार्थी हक्काचे 12 ते 15 क्विंटल तांदूळ विक्री गैर प्रकण उघडकीस करण्या साठी तक्रार दार शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी वेळोवेळी खाल पासून ते वर पर्यंत संबंधित अधिकाय्रांकडे तक्रारी अर्ज केले परंतु या गंभीर व दखल पात्र प्रकणा कडे लक्ष देणया करीता शिक्षण विभाग व शालेय पोषण आहार अधिक्षक रावेर यांना लाक डाउन मुळे की काय चाळीस दिवस चौकशी साठी वेळच मिळालेला नाही. सबब सदरील अधिक्षकांची कुचकामी भुमिके बद्दल व शाळा संबंधितांवर चौकशी होणे कामी गटविकास अधिकारी वर्ग 1 व सभापती जितेंद्र पाटील कडे तक्रार केले असुन ही सदरील तांदूळ विक्री गैर प्रकणाची थेट चाळीस दिवसा नंतर शालेय पोषण आहार अधिक्षक रावेर सह दोन केंद्र प्रमुख जर शाळेत येऊन त्यांना हवी असलेली चौकशी करून असे सोंग दाखवण्या मागचे कारण काय? मांजर डोळे बंद करून दुध पिते आणि समजते जग आंधळा आहे असे गृहीत धरून हा सर्व घटना क्रम बदलवणयाचा किंवा अप्रत्यक्ष पणे लपवण्याचा प्रकार लोकशाही मध्ये जास्त काळ टिकणारा नसतो हे कोणाला ही विसरता कामा नये.

रावेर तालुक्यात सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे तांदूळ पुरवठा करणारे वाहतूक ठेकेदारांशी 14 मे रोजी ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी युसूफ शाह यांनी आपली शोधक पत्रकारितेची भुमिका घेऊन थेट वाहतूक ठेकेदारांशी केलेल्या प्रश्नांची उत्तरात त्यांनी असे म्हटले आहे की शा पो आ चे तांदूळ ज्या सरकारी कंदान मध्ये येतात तशे चे तशे सर्व शाळा मध्ये मी वाटप करतो. लाक डाउन आधी अॅगलो उर्दू हाय सावदा शाळा येथे शापो आहाराचे तांदूळ सरकारी कंदान मध्येच वाटप दिली आहे. त्या वेळी वीस ते पंचवीस लोक सुध्दा हजर होते. खाजगी सफेद पलासटीक गोन्या मध्ये सरकारी तांदूळ येत नाही. महणुन अश्या प्रकारच्या गोन्यात तांदूळ सदरील शाळेत मी वाटप देण्याचे प्रश्नच येत नाही. तांदूळ च्या खाली सरकारी कंदान पोते आज पावेतो मला सदरील शाळेने परत केलेले नाही.

तसेच शालेय पोषण आहाराचे तांदूळ खराब होऊ नये असे मुख्य हेतू ठेऊन प्रत्येक शाळेत टीन च्या कोठया पंचायत समिती मार्फत देण्यात आल्या असून ही सदरील शाळेत या चीनच्या कोठया उपलब्ध असतांना त्यात शालेय पोषण आहाराचे तांदूळ नसल्याचे कारण काय. जर खाली सरकारी कंदान पोते वाहतूक ठेकेदारास आज पर्यंत शाळेने परत केले नाही तर त्या ऐवजी शाळेत फैजपूर व अंबड साखर कारखान्याच्या मोठ्या प्रमाणात तांदूळाने भरलेल्या खाजगी पलासटीक गोन्या कोठुन व कसे आले.या सर्व गंभीर बाबी समोर ठेवून कर्तव्य दक्ष अधिकारी मार्फत सखोल चौकशी झाली तर या तांदूळ विक्री गैर प्रकणाशी संबंधित असलेल्यांचे निश्चितच पितळ उघडे पडतील पंरतु दीड महिना उलटून ही या प्रकरणाची योग्य रित्या दखल घेण्यात आली नसल्याने कोन व कधी याची दखल घेतील हा सर्वात गंभीर प्रश्न आता तक्रार दारासह नागरिकांना भेडसावत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button